JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रिया-सुशांत ड्रग्ज प्रकरण: आणखी एक मोठा मासा KJ लागला गळाला, असा व्हायचा पुरवठा

रिया-सुशांत ड्रग्ज प्रकरण: आणखी एक मोठा मासा KJ लागला गळाला, असा व्हायचा पुरवठा

सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविकला तो ड्रग्जचा पुरवढा करत होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Jमुंबई 12 सप्टेंबर: रिया आणि सुशांतला ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात NCBच्या गळाला आणखी एक मोठा मासा लागला आहे. ड्रग्ज पुरवढा करणारा ‘KJ’ याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. करनजीत असं त्याचं नाव असून त्याला ‘KJ’ या टोपण नावाने ओळखलं जात होतं. मुंबईतून त्याला अटक करण्यात आला आहे. ‘KJ’ हा कॅपरी आणि लिटिल हाइट् इथं ड्रग्ज पुरवढा करत होता अशी माहिती पुढे आली आहे. सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविकला तो ड्रग्जचा पुरवढा करत होता. त्यानंतर हा सगळा माल रिया आणि सुशांतला दिला जात होता अशी माहितीही पुढे आली आहे. करमजीतला NCBच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं आहे. त्याचा कसून चौकशी सुरू आहे. शोविक सोबत त्याचे थेट संबंध असल्याने अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. NCBने तब्बल 7 ठिकाणी धाडी घातल्या असून त्यात ड्रग्जचा मोठा साठाही हाती लागला आहे. आत्तापर्यंत 6 ते 7 ड्रग्ज पुरवढा करणाऱ्यांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. रिया चक्रवर्ती सुशांतबरोबर घेत होती ड्रग्ज, Unseen Video आला समोर रिया चक्रवर्ती हिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई बरोबर गोव्यात छापे घातले होते.  प्रामुख्याने उत्तर गोव्यातील अंजुना इथं इथेही कारवाई झाली होती. यापूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईल चॅटमध्ये नाव आलेल्या गौरव आर्या आणि त्याच्या संबंधित ठिकाणी हे छापे असण्याची शक्यता आहे. यावेळेस आणखीन काही व्यक्तींची माहिती मिळविण्यात येत असून त्याच्याकडून अधिकचा तपशील शोधण्यात येणार आहे. गोव्यात ड्रग्ज डीलर अनुज केशवानी याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  7 ठिकाणी छापे मारण्यात आले आहे. या सहा ठिकाणी ड्रग्ज माफियांकडून पार्टीचे आयोजन केले जात होते. या कारवाईत आतापर्यंत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं, सुशांतच्या डॅग्ज पार्टीचा खुलासा रियाने दिलेल्या माहितीतून अनुज केशवानीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अनेक नाव समोर आली आहे. या बरोबरच नव्याने गौरव आर्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या