JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / SSR Death Case: रिया होती सुशांतच्या मॅनेजरच्या कायम संपर्कात, CBI उलगडणार गुपीत?

SSR Death Case: रिया होती सुशांतच्या मॅनेजरच्या कायम संपर्कात, CBI उलगडणार गुपीत?

CBI रिया आणि सॅम्युएलच्या संभाषणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असून त्यातून बरीच माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी CBIच्या तपासाने आता वेग घेतला आहे. या प्रकरणात संशयाची सगळी सुई ही सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती भोवती फिरत आहे. रिया ही सुशांतचा मॅनेजर सॅम्युएलच्या सतत संपर्कात होती असं आता स्पष्ट होत आहे. सीबीआयने रिया आणि सॅम्युलच्या फोन्सचे डिटेल्स CDR मिळवला असून त्यातून ही गोष्ट पुढे आली आहे. आता त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याचं गुपीत उलगडण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे. सॅम्युएल हा घरातील व्यवहार आणि खर्चाची, बँकांची कामं पहायचा  त्यामुळे सीबीआय आता सॅम्युल आणि रियाच्या CDRचा अभ्यास करत आहे. सॅम्युएल हा सुशांतचा मॅनेजर असला तरी तो सतत रियाच्या संपर्कात असायचा. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी मुंबई पोलिसांना DRDO येथे बोलावलं होतं. सॅम्युल हा सतत रियाच्या का संपर्कात असायचा याचा उलगडा करण्याचा सीबीआयचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. सीबीआयने दोघांचे CDR मिळवले आहेत. त्यात ही माहिती उघड झाली आहे. CDR चा अभ्यास केल्यास रिया दररोज सॅम्युएल च्या सतत संपर्कात होती हे स्पष्ट झालं होतं. ‘सुशांतच्या खोलीत कुणी येऊ शकत नव्हतं’, CBI रिक्रिएशनमध्ये गोष्टींचा उलगडा रिया ही सॅम्युएला दिवसातुन अनेकदा फोन करायची. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली. जून महिन्यात रियाने सॅम्युएलला 6 तारखेला फोन केला होता. यावेळी ती सॅम्युएल सोबत 121 सेकंद बोलली. त्यानंतर सॅम्युलने रियाला फोन केला तेव्हा दोघे 103 सेकंद बोलले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे  6 जून नंतर रियाने सॅम्युएला थेट 14 जुलै 2020 रोजी फोन केल्यांचं स्पष्ट झालं आहे. यावेळी दोघांचं 1191 सेकंद म्हणजे सलग 20 मिनिट बोलणं झालं आहे. SSR Case: शिबानी दांडेकर मिस्ट्री गर्ल असल्याचा दावा, भडकली फरहानची गर्लफ्रेंड या संभाषणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न आता सीबीआय करत असून त्यातून बरीच माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या