जिनिलीया- रितेश देशमुख
मुंबई, 17 डिसेंबर : रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलीया वहिनी त्यांच्या लवस्टोरीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटामधुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. पण जिनिलिया आणि रितेशच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. राजकीय पार्श्वभूमी असल्याने रितेशच्या कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. मात्र दोघांच्या प्रेमापुढे सारं काही फिकं पडलं आणि ते विवाह बंधनात अडकले. या दोघांच्या लवस्टोरीमध्ये अनेक चढ उतार आले. आता ही जोडी लवकरच ‘वेड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या निमित्त या दोघांनी न्यूज 18 लोकमतशी एस्क्लुझिव्ह गप्पा मारल्या. दोघांनीही अनेक गोष्टी शेअर केल्या. तसंच रितेशने यावेळी त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखने ‘वेड’ च्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. यावेळी रितेशला त्याच्या प्रेमाची व्याख्या काय आहे हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं. या प्रश्नाचं उत्तर देताना रितेश म्हणाला, ‘प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते आणि ती वयानुसार बदलत असते. वयानुसार तुमच्या प्रेमाचा दृष्टिकोन बदलत असतो.’ हेही वाचा - Ritesh Genelia Exclusive: पाणी पुरी की पिठलं भाकरी? देशमुखांच्या सुनेला आवडतात या गोष्टी तो पुढे म्हणाला, ‘वयाच्या 14 वर्षी झालेलं प्रेम वेगळं असत. आपण प्रेम करतो त्या व्यक्तीची एक झलक देखील पुरेशी असते. हेच आम्ही बेसुरी या गाण्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.’ असं तो म्हणाला. पुढे त्याचा स्वतःचा अनुभव सांगताना रितेश खुलासा करत म्हणाला कि, ‘माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. परीक्षेच्या वेळी ती माझ्या पुढे बसायची. तेव्हा पेपर लिहिताना मला फक्त तिचे केस आणि हात दिसायचा. पण तेवढं पाहूनच मी खुश व्हायचो.’
हे सांगताना तो म्हणाला कि, ‘पण याबद्दल मी तिला कधीच सांगू शकलो नाही, तिच्यासमोर माझं प्रेम व्यक्त करू शकलो नाही. तोच प्रेमातला वेडेपणा आहे. न सांगताही तुम्ही स्वतःचं प्रेम व्यक्त करू शकता.’ अशा भावना व्यक्त करत रितेशने प्रेमाची व्याख्या सांगितली.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा अपूर्ण राहिलेल्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ‘वेड’ चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं असून तो आणि जिनिलिया मुख्य भुमिकेत झळणार आहे. आता या दोघांचं ‘वेड’ मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.