JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ved Movie: 'वेड'च्या भरघोस यशानंतर रितेश देशमुखची मोठी घोषणा; प्रेक्षकांना देणार 'हे' सरप्राईज

Ved Movie: 'वेड'च्या भरघोस यशानंतर रितेश देशमुखची मोठी घोषणा; प्रेक्षकांना देणार 'हे' सरप्राईज

बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असताना रितेशने चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात

रितेश आणि जिनिलिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15  जानेवारी: रितेश आणि जिनिलियाच्या वेड चित्रपटाची सगळ्यांनाच भुरळ पडली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चलती आहे. या चित्रपटापुढे  बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचीही अवस्था वाईट झाली आहे. ‘वेड’ मुळे मराठी चित्रपटासाठी नव्या वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात झाली आहे. वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. आता रितेशचं सगळीकडेच कौतुक होत असताना रितेशने पुन्हा मोठी घोषणा केली आहे. रितेशने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत वेड विषयी मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं खास करून सत्या आणि श्रावणीच्या लव्हस्टोरीबद्दल असणार आहे. या गाण्यात प्रेक्षकांना पुन्हा रितेश आणि जिनिलियाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - Hruta Durgule: ‘काम मिळवण्यासाठी फक्त तेवढंच…’ हृता दुर्गुळेचा मनोरंजन विश्वाबद्दल मोठा खुलासा रितेशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये चित्रपटातील सत्या त्याच्या जिवलग मित्रासोबत गप्पा मारत आहे. रितेशचा मित्र त्याला ‘वेड’ चित्रपटाविषयी जाणीव करून देतो कि ‘वेड’ मध्ये सत्या आणि श्रावणीच शेवटी एकत्र आले असले तरी या दोघांचं एकही गाणं नाहीये. त्यावर रितेश देखील विचार करू लागतो आणि सत्या आणि श्रावणीच्या गाण्यासाठी तयार होतो. या व्हिडिओला रितेशने ‘लवकरच येत आहे…’ असा कॅप्शन दिला आहे.रितेशने केलेल्या या घोषणेमुळे प्रेक्षक खूपच उत्सुक झाले असून काही वेळातच रितेशची ही  पोस्ट व्हायरल झाली आहे.

संबंधित बातम्या

रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे पण अजूनही या सिनेमाचं वेड महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे. रितेशन अलीकडेच सिनेमाच्या कमाईबद्दल पोस्ट केली आहे.  वेडनं दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 2.52 कोटी, शनिवारी 4.53, रविवारी सर्वाधिक 5.70 कोटींची कमाई केली आहे. तर या सिनेमाची संपूर्ण कमाई  40.85 कोटींच्या पार गेली आहे. रितेशने पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. शेअर केलेल्या या लेटेस्ट पोस्टवरही चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या रविवारी 5.70 कोटींची कमाई करत, एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडला होता. तर रितेशने त्याचाच सिनेमा ‘लय भारी’च्या एकूण कमाईचा आकडाही केव्हाच पार केला आहे. त्यामुळे आता रितेशचा सर्वाधिक हिट ठरलेला मराठी सिनेमा म्हणून ‘वेड’चे नाव घ्यावे लागेल. आता रितेश आणि जिनिलियाचं नवं गाणं कोण गाणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या