मुंबई, 3 मे : अभिनेता ऋषी कपूर सप्टेंबर 2018 पासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी कोणता आजार झाला आहे हे जाहीररित्या बोलणं नेहमीच टाळलं. काही दिवासांपूर्वीच निर्माता राहुल रवैल यांनी ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता याचा खुलासा त्यांच्या फेसबुक पोस्टमधून केला होता. तसेच ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता पण आता ते कॅन्सर फ्री झाले आहेत अशी कबूली दिली होती. त्यानंतर ऋषी कपूर यांनी पहिल्यांदाच स्वतःहून त्यांना कोणता आजार झाला होता आणि त्याच्या उपचारांचा अनुभव कसा होता याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषी कपूर यांनी कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत कॅन्सरच्या उपचारांचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले, ‘यूएसमध्ये 8 महीन्यांची माझी ट्रीटमेंट 1 मे ला सुरू झाली होती. मात्र देवाची माझ्यावर कृपा होती. आता मी कॅन्सर फ्री आहे.’ ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाले असले तरीही त्यांची ट्रीटमेंट अद्याप सुरू असून त्यांना रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागणार असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलं आहे. त्यामुळे ते पुढच्या काही महिन्यात भारतात परततील अशी माहिती त्याचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी दिली.
‘या’ कारणासाठी मिस्टर परफेक्शनिस्ट कमी करणार 20 किलो वजन भारतात परतण्यासाठी ऋषी कपूर खूप उत्सुक असून त्यांनी, ‘मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं आहे. ज्यामध्ये कमीत कमी 2 महिने जाणार आहेत. आजारातून बरं होणं खूप मोठी गोष्ट आहे. हे केवळ माझे कुटुंबीय आणि माझ्या चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे शक्य झालं आहे. मी सर्वांचा आभारी आहे.’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय त्यांनी त्यांची पत्नी नितू कपूर आणि मुलं रणबीर कपूर व रिद्धिमा यांचेही आभार मानले. न्यूयॉर्कला जाणाऱ्यापूर्वी ऋषी कपूर यांनी मुल्क या सिनेमात काम केलं होतं. यात त्याच्यासोबत तापसी पन्नूचीही प्रमुख भूमिका होती.
दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’ जे संजय-सलमानला जमलं नाही ते ‘बादशाह’ने करून दाखवलं