sonam kapoor and rhea kapoor
मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूडच्या कलाकारांच्या मुलांची नावं खास असतात. त्यांची प्रचंड चर्चा होते. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर हिने 20 ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून सोनम कपूरच्या बाळाचं नाव देखील काय असेल हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तिच्या बाळाचं नाव अजून ठेवलं नसलं तरी बाळाच्या मावशीने म्हणजेच रिहा कपूरने आपल्या भाच्याचं टोपणनाव सांगितलं आहे. त्याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. कपूर घराण्यात आनंदी आनंद आहे. सोनम कपूर आणि आनंद अहुजा या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. डिलिव्हरीनंतर काल सोनम आपल्या बाळाला घेऊन घरी परतली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या सोनमच्या चिमुकल्याचं मुंबईतील राहत्या घरी शानदार स्वागत करण्यात आलं. पण आता सोनमच्या बाळाचं टोपणनाव समोर आलं आहे. बाळाच्या मावशीने आपल्या लाडक्या भाच्याला ‘सिम्बा’ असं म्हंटल आहे. हेही वाचा - Devendra Fadnavis : नागपूर प्रवासात उपमुख्यमंत्र्यांना भेटले खास कलाकार; पोस्ट शेअर करत केलं तोंडभरून कौतुक शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा आपल्या मुलाला घरात घेऊन जाताना दिसत होते. या आनंदाच्या प्रसंगी आजोबा अनिल कपूर यांनी मिठाई वाटली. आता रिहा कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही व्हिडिओ शेअर केले आहेत त्यामध्ये घराच्या सुंदर सजावटीची झलकही शेअर केली होती. याच स्टोरीमध्ये रिहाने ‘वेलकम होम सिम्बा’ असं म्हटलं होतं. तेव्हापासून सोनमच्या चाहत्यांमध्ये बाळाच्या नावाविषयी चर्चा सुरु झाली आहे.
सोनमच्या स्वागताचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोनमने वडील अनिल कपूर यांनी नातवाच्या स्वागतात कोणतीच कसूर सोडली नाही. त्याचे जंगी स्वागत केले. यावेळी अनिल कपूर हे सगळीकडे मिठाई वाटतानाही दिसून आले. दरम्यान बाळाच्या मावशीने म्हणजेच रिहा कपूरने बाळाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. फोटोत बाळाला पाहिल्यानंतर मावशीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले होते. रिहा कपूरने रुग्णालयातील बाळाचे फोटो शेअर केले होते. आता सोनमने चाहते बाळाला पाहण्यासाठी आतुर झाले आहे.