मुंबई, 17 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मागच्या बऱ्याच काळापासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अंकिता लोखंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. मध्यंतरीच्या काळात त्याचं नाव सारा अली खानशी जोडलं गेलं होतं. पण काही काळातच त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं आणि मग सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या दोघांना अनेकदा एकत्रही पाहिलं गेलं. मात्र आता या नात्यावर रियानं मौन सोडलं आहे. रिया आणि सुशांतच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर अनेकदा झाल्या आहेत. मात्र या दोघांनी याबद्दल कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता रियानं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत आपला बॉयफ्रेंड नाही तर एक चांगला मित्र आहे असं रियानं एका मुलाखतीत म्हटलं आहे. रिया म्हणाली, आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आणि आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं. त्यामुळे आमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे. Lockdown Effect : ‘पंचनामा’ फेम अभिनेत्रीनं चक्क किचनमध्ये केलं BOLD फोटोशूट!
इन्स्टाग्राम लाइव्हवर ई-टाइम्सशी बोलताना रिया म्हणाली, मी किंवा सुशांत दोघांपैकी कोणीच हे अफेअर कधीच एक्सेप्ट केलं नव्हतं. कारण आमच्या तसं काहीही नाही. सुशांत माझा खूप चांगला मित्र आहे. मागच्या 8 वर्षांपासून आम्ही दोघंही एकमेकांना ओळखतो. सुशांत खूप हॅन्डसम आणि सुंदर आहे. मात्र त्याला माझ्याबद्दल काय वाटतं हे मला माहित नाही. कंगनाच्या बहिणीचं Twitter अकाउंट झालं बंद, वाचा नेमकं काय आहे कारण एजाज खानच्या VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ, अभिनेत्याच्या अटकेची होतेय मागणी