JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...अन् नेटकरांनी रेणुका शहाणेला विचारलं तुझा नवरा किती शिकलाय?

...अन् नेटकरांनी रेणुका शहाणेला विचारलं तुझा नवरा किती शिकलाय?

अभिनेत्री रेणुका शहाणे ट्विटरवर फार सक्रीय असतात. चालू घडामोडींवर त्या सोशल मीडियामार्फत व्यक्त होत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मे- सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. एकीकडे प्रत्येक पक्ष आपणच किती चांगले आहोत हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत तर दुसरीकडे कलाकार मंडळीही ठराविक एका पक्षाचं खुलेपणाने समर्थन देताना दिसत आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा दिसते. प्रत्येकजण आपली मतं आणि विचार ट्विटर, फेसबुकवर शेअर करत निवडणुकांच्या रणधुमाळीत सहभागी होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे ट्विटरवर फार सक्रीय असतात. चालू घडामोडींवर त्या सोशल मीडियामार्फत व्यक्त होत असतात. आताही काहीसे असेच झाले. अभिनेता अनुप सोनी यांनी ट्विटरवर आपलं मत शेअर करत म्हटलं की, ‘मला खरंच असं वाटतं की निवडणुकांसाठी उभं राहणाऱ्या उमेदवाराचं किमान शिक्षण असणं आवश्यक असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटत?’ निवडणुकांचा परिणाम आता KBC वरही, विचारला ‘सर्जिकल स्ट्राइक’वर प्रश्न

अनुप यांच्या या प्रश्नावर अनेक नेटकऱ्यांनी आपआपली मतं दिली. यात रेणुका यांनीही आपलं मत देताना म्हटलं की, ‘मला हा मुद्दा फारसा पटला नाही. शिक्षणाने अक्कल, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा येतोच असं नाही. मी अशा अनेक लोकांना ओळखते जे उच्च शिक्षित आहेत. पण ते दुराचारी, जातीयवादी आणि मतभेद करणारे आहेत.’ रेणुका यांचं हे उत्तर काहींना पटलं तर काहींनी तिला उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर मी भगवी साडी नेसले तर मी ‘साध्वी स्वरा भास्कर’ होईन का? द सेक्युलर या नावाच्या ट्विटर अकाउंटवर रेणुका यांना तुमचा नवरा किती शिकलाय असा प्रश्न विचारण्यात आला. रेणुका या नेटकरांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी ओळखल्या जातात. या प्रश्नाचं जसंच्या तसं उत्तर देत त्यांनी अभिनेते आशुतोष राणा आणि त्यांचं स्वतःचं संपूर्ण शिक्षण ट्विटरवरच सांगितलं.

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, चाहत्यांना भेटलेच नाहीत रेणुका म्हणाल्या की, ‘माझ्या नवऱ्याने मध्यप्रदेशच्या सागर विद्यापिठातून बीए केलं असून दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून एमए केलं आहे. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून मी सायकॉलॉजीमध्ये पदवी घेतली असून मुंबई विद्यापिठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमए केलं आहे.’ सध्या रेणुका शहाणे यांचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत असून यापुढए रेणुका यांना उलट प्रश्न विचारताना नेटकरांना १० वेळा विचार करावा लागेल हे मात्र नक्की. नेटफ्लिक्सचा हा शो पाहून 12 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या