JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कार रेसर झाली अडल्ट स्टार! 25 वर्षीय रेनी ग्रेसीनं सांगितलं हा मार्ग निवडण्याचं कारण

कार रेसर झाली अडल्ट स्टार! 25 वर्षीय रेनी ग्रेसीनं सांगितलं हा मार्ग निवडण्याचं कारण

ग्रेसी 2008 मध्ये पहिल्यांदा फुल टाइम सुपर कार रेसर झाली होती. 2015 पर्यंत तिनं खूप चांगलं प्रदर्शन केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : सध्या असा काळ सुरू आहे ज्यात कधी काय होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियाची फुल टाइम सुपरकार रेसर रेनी ग्रेसीनं अडल्ट स्टार होण्यासाठी कार रेसिंगला रामराम ठोकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या पूर्व V8 सुपरकार ड्रायव्हरनं असा दावा केला आहे की, आता ती एका आठवड्यात 25 हजार डॉलर (19 लाख रुपये) महिन्याला कमावते. ग्रेसी 2008 मध्ये पहिल्यांदा फुल टाइम सुपर कार रेसर झाली होती. 2015 पर्यंत तिनं खूप चांगलं प्रदर्शन केलं. 2017 नंतर ग्रेसीचे रिजल्ट कमी झाल्यावर तिला स्पॉन्सर्स मिळणं बंद झालं. तिची जागा अन्य डायव्हर्सनी घेतली. आपलं पोट भरण्यासाठी ग्रेसीला गॅरेजमध्येही काम करावं लागलं. पण काही दिवसांतच ग्रेसीला समजलं की, यातूनं तिची आर्थिक परिस्थिती सुधरणार नाही. त्यामुळे तिनं पैसे कमवण्यासाठी अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली. जान्हवी कपूरला लागलेत बाळाचे वेध? सोशल मीडिया पोस्टमुळे उडालाय सर्वांचा गोंधळ ग्रेसीचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे. त्यामुळे तिनं ओनली फॅन्स साइटची मदत घेतली. ग्रेसीनं या वेबसाइटवर स्वतःचं अकाऊंट बनवलं आणि त्यावर आपले न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर विकायला सुरुवात केली. सुरुवातीला यातून तिला एका आठवड्यात 3 हजार डॉलर्स मिळत असत. पण जशी तिच्या सब्सक्रायबरची संख्या वाढत गेली तसा तिला जास्त नफा होऊ लागला.

25 वर्षीय रेनी ग्रेसीनं ऑस्ट्रेलियाच्या डेली टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, तिचे सध्या 7 हजार पेक्षा जास्त सब्सक्रायबर आहेत. तिच्या व्हिडीओ आणि फोटोंचं महिन्याभराचं सब्सक्रिप्शन12.96 डॉलर आहे. ग्रेसी म्हणाली, रेसिंगमध्ये माझे चांगले रिझल्ट येत नव्हते. त्यामुळे मला स्पॉन्सर्स मिळणं बंद झालं होतं. मी चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती एवढी वाईट झाली होती की, माझ्या स्वप्नं तुटली. पण अडल्ट स्टार होणं माझ्या लाइफमधील सर्वात चांगली गोष्ट आहे. दीपिकाच्या मुलांबद्दल असं काही बोलला एक्स बॉयफ्रेंड रणबीर की, चकीत झाला रणवीर

ग्रेसी पुढे म्हणाली, मी माझे फोटो आणि व्हिडीओ विकते आणि लोक मला टीप देतात. मी आता 30 वर्षांसाठी घर घेतलं आहे. ज्याची किंमत आता मी वर्षभरात चुकवू शकते. माझ्या आयुष्यात आता आर्थिक स्थैर्य आलं आहे. ज्याच्याबद्दल मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. मी यात खूश आहे. जे मी माझ्या रेसिंग करिअरमध्ये कमावलं नव्हतं ते मी आता कमावलं आहे. ‘प्लेन लड़का उड़ाए या लड़की, उसे पायलट ही कहते है’ पाहा जान्हवीचा नवा अवतार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या