रेखा
मुंबई, 22 जुलै : अभिनेत्री रेखाचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. वडिलांचे अवैध अपत्य असण्यापासून ते 2 लग्न आणि 6 अफेअर्सपर्यंत तिचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं होतं. 80 च्या दशकातील या नायिकेच्या वैयक्तिक आयुष्याची आजही चर्चा होते. या अभिनेत्रीच्या आयुष्यात अफेअरपासून लग्नापर्यंत अनेक गुपिते आहेत. तिचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अफेअरचे किस्से आजही मोठ्या आवडीने ऐकले जातात. पण अभिनेत्रीचं तिच्या सेक्रेटरी फरजानासोबत असलेल्या नात्याची आता चर्चा होत आहे. तिच्या चरित्रातही हा दावा करण्यात आला आहे. काही काळापूर्वी अभिनेत्रीची बायोग्राफी प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये अभिनेत्रीच्या आयुष्यातील एका अफेअरबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यात रेखा तिच्या सेक्रेटरीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचं लिहिलं आहे. रेखाच्या सेक्रेटरीचे नाव फरजाना आहे, जी कित्येक वर्ष झाले रेखासोबत सावलीसारखी राहत आहे. फरजाना नेहमीच प्रत्येक कार्यक्रम, पार्टी आणि फंक्शनमध्ये अभिनेत्रीसोबत दिसते.
रिपोर्ट्सनुसार, फरजाना पूर्वी रेखाची हेअर ड्रेसर होती. कित्येक वर्ष ती रेखासोबत हेच काम करायची, पण हळूहळू त्यांचे नाते घट्ट होत गेले. यानंतर रेखाने हेअर ड्रेसरवरून तिला आपली सेक्रेटरी बनवलं. कोणाला रेखाला भेटायचे असेल तर आधी फरझानाची परवानगी घ्यावी लागते, असे म्हटले जाते. बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीनं एकेकाळी उधार पैसे घेऊन बनवलेला पोर्टफोलिओ; आज घेते सर्वात जास्त मानधन रेखा आणि फरजाना यांच्या नात्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, रेखाच्या मेहुण्याने एकदा त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते की, त्यांचे नाते पती-पत्नीसारखे आहे. त्याचबरोबर यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखाच्या जीवनचरित्रात अभिनेत्री फरजानासोबत गेल्या तीस वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यासिर उस्मानच्या 2016 साली आलेल्या पुस्तकात असाही दावा करण्यात आला होता की, रेखाच्या बेडरूममध्ये फक्त फरझानालाच प्रवेश देण्यात आला होता. तिचे लव्ह लाईफ, लग्न आणि पतीशी संबंधित अनेक खुलासे या पुस्तकात करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध पत्रकार मोहन दीप यांनी त्यांच्या ‘युरेका’मध्ये हा दावा करून हे रहस्य उलगडले आहे. या पुस्तकात लिहिले आहे की रेखाच्या बंगल्यात तिची पर्सनल सेक्रेटरी फरजाना शिवाय कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. पुस्तकात असा दावाही करण्यात आला आहे की, रेखाच्या बेडरूममध्ये फरजानाशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाही. या दोघींमधील संबंध सामान्य नसल्याचा दावा पत्रकार मोहन यांनी केला आहे. दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहतात. असेही त्यांनी लिहिले आहे.आजकाल रेखा अभिनयापासून दूर आहे, पण रिअॅलिटी शो आणि पार्ट्यांमध्ये तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्धी मिळवत आहे.