JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / तळेगावातील 311 नंबरचा 'तो' फ्लॅट; मृत्यूच्या 48 तास आधी रवींद्र महाजनींबरोबर नेमकं काय घडलं?

तळेगावातील 311 नंबरचा 'तो' फ्लॅट; मृत्यूच्या 48 तास आधी रवींद्र महाजनींबरोबर नेमकं काय घडलं?

रवींद्र महाजनी यांचा मृत्यू होण्याच्या दोन दिवस आधी नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

रवींद्र महाजनींच्या मृत्यूआधी काय घडलं?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : अभिनेता रवींद्र महाजनी यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आणि त्यांच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.  रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून वास येत होता. या बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू होण्याच्या दोन दिवस आधी नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. रवींद्र महाजनी हे पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबी इथल्या क्सर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. त्यांनी तिथला 311 नंबरचा भाडेतत्त्वावर घेतला होता. मागील 8-9 महिने ते तिथे राहत होते अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, रवींद्र महाजनींच्या सोसायटीत कचऱ्या गोळा करणाऱ्या आदिका वारंगे यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, “मी इमारतीत कचरा गोळा करायचे. त्यांच्याकडून पाण्याची बाटली घ्यायचे आणि त्यांना पुन्हा नेऊन द्यायचे. मंगळवारी त्यांनी स्वत: माझ्या हातात कचऱ्याची पिशवी दिली होती. कचरा घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले की मी त्यांचा दरवाजा ठोठवायचे. बुधवारी माझी सुट्टी होती. गुरूवारी सकाळी त्यांचा दरवाजा ठोठावला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मी दुपारीही त्यांच्या घरी गेले पण तेव्हाही दरवाजा बंद होता”. हेही वाचा -  Ravindra Mahajani : बेड अस्ताव्यस्त, चेहरा काळा पडलेला, 2 दिवस मृतदेह पडून, महाजनींचा शेवटचा भयंकर फोटो समोर

आदिका वारंगे पुढे म्हणाल्या, “दुसऱ्या दिवशी सोसायटीचे लोक वास येत असल्याचं म्हणू लागले. तेव्हाही मी त्यांच्या घराजवळ जाऊन कुठे कचरा पडलाय का हे पाहायला गेले. पण त्याच्या घराबाहेर कुठेही कचरा नव्हता. त्यांचा दरवाजा तेव्हाही बंद होता”. शुक्रवारी सकाळपासून इमारतीत दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा सगळ्यांच्या नजरा 311 नंबरच्या महाजनींच्या फ्लॅटकडे गेल्या. त्यांचा दरवाजा दोन दिवसांपासून बंद होता. रहिवाश्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. दरवाजा उघडल्यानंतर रवींद्र महाजनी मृत अवस्थेत जमिनीवर पडले होते. आंघोळीनंतर कपडे घालताना ते पडले असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या