रविना टंडन
मुंबई, 19 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम फेरीचा भव्य सामना पाहण्यासाठी अनेकांनी आपली उपस्थिती लावली होती. फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना स्टेडियममध्ये बसून पाहणे हे प्रत्येक फुटबॉल चाहत्याचे स्वप्न असते. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्यासाठी बॉलिवूड करांनीही ग्लॅमरस तडका लावला. अनेक कलाकारांनी कतारला जात या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेतला. यामध्ये अभिनेत्री रविना टंडनताही समावेश होता. अभिनेत्रीचे मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री रविना टंडन आपल्या मुलाला घेऊन फिफा वर्ल्ड कप 2022चा क्रोएशिया आणि मोरोक्कोमध्ये झालेली मॅच पाहिली. दरम्यान, रवीनाने स्टेडियमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगा रणवीर सोबत दिसत आहे. सामना पाहण्यासाठी कतारला गेली होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रविना लहान मुलगा रणबीर थडानीसोबत काही दर्जेदार वेळ घालवताना दिसत आहे. ‘हा मुलाचा वेळ आहे’, असं म्हणत रविनाने हा चिअरफुल व्हिडीओ शेअर केला. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. आई-मुलाची बॉन्डिंग पाहून तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. ‘मदर ऑफ द इयर, खूप छान बॉन्डिंग आहे, तो त्याच्या वडिलांसाररका दिसतो. टीनेजर थिंग, रविना मस्त एन्जॉय करतेय’, अशा अनेक प्रतिक्रिया रविनाच्या व्हिडीओवर येत आहे.
रविनाशिवाय नोरा फतेही, करिश्मा कपूर, कार्तिक आर्यन शनाया कपूर, चंकी पांडे, आदित्य रॉय कपूर, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी देखील हजेरी लावली होती. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अंतिम सामन्यादरम्यान त्यांच्या पठाण चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. दरम्यान, 2017 पासून अभिनयापासून ब्रेकवर असलेली रवीना अखेरची यश अभिनीत KGF: Chapter 2 या ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपटात दिसली होती. पीरियड अॅक्शन चित्रपटात तिने पंतप्रधान रमिका सेनची भूमिका केली होती. पुढच्या वर्षी ती ‘घुडछडी’ या रोमँटिक कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे. बिनॉय गांधी दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्याही भूमिका आहेत.