JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रवीना टंडन 'त्या' सीन्समुळे व्हायची अस्वस्थ; स्विमिंग सूट घालण्यासही दिला होता नकार

रवीना टंडन 'त्या' सीन्समुळे व्हायची अस्वस्थ; स्विमिंग सूट घालण्यासही दिला होता नकार

बॉलिवूडमधल्या यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचा समावेश होतो. रवीनानं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

जाहिरात

रवीना टंडन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 फेब्रुवारी : बॉलिवूडमधल्या यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचा समावेश होतो. रवीनानं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा कॅमेऱ्यासमोरचा वावर अतिशय सहज वाटत असे. अतिशय बिनधास्त आणि बोल्ड वाटणाऱ्या रवीनाला अभिनय करताना एका गोष्टीबाबत भीती वाटत असे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं स्वत:च याबाबत खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना म्हणाली की, चित्रपटांमध्ये रेप सीन करताना तिला अस्वस्थ वाटत असे. त्यामुळे असे सीन करताना तिनं स्वत:चे काही फंडे तयार केले होते. ती दिग्दर्शकाकडे अशी मागणी करत असे, की रेप सीनदरम्यान तिचे कपडे पूर्णपणे शाबूत राहिले पाहिजेत. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रवीनानं अशा गोष्टींची यादी शेअर केली आहे, ज्या करताना तिला अस्वस्थ वाटत असे. ती म्हणाली, “मी बर्‍याच गोष्टींमुळे अस्वस्थ व्हायचे. एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ वाटत असेल तर मी ते करत नव्हते. मी सांगायचे, की मला या डान्स स्टेप्समध्ये कम्फर्टेबल वाटत नाही. मी ही स्टेप करणार नाही. मला स्विमिंग कॉस्च्युमही घालण्याची इच्छा नव्हती आणि मी किसिंग सीनही केले नाहीत. माझे स्वत:चे फंड होते. मी एकमेव अशी अभिनेत्री होते, जिचा ड्रेस न फाटताही रेप सीन शूट झाले होते. माझे सर्व कपडे पूर्णपणे शाबूत असायचे.” हेही वाचा - Kriti Sanon-Prabhas: क्रिती आणि प्रभास ‘या’ दिवशी उरकणार साखरपुडा? त्या ट्विटमुळे चर्चांना उधाण न आवडणाऱ्या गोष्टींना रवीना नकार देत असे. यामुळे काही सहकलाकार आणि निर्माते तिला अहंकारी म्हणायचे. यामुळे तिच्याकडून बरेच चित्रपटही काढून घेण्यात आले. त्यानंतर रवीनानं खुलासा केला की, करिश्मा कपूरचा पहिला चित्रपट ‘प्रेम कैदी’ अगोदर रवीनाला ऑफर करण्यात आला होता. पण, एका सीनमध्ये हिरो हिरोइनच्या ड्रेसची चेन खाली करताना आणि अंतवर्स्त्राचा बेल्ट उघडा झाल्याचं दिसणार होतं. म्हणून तिने तो चित्रपट नाकारला.

“डर हा चित्रपट पहिल्यांदा माझ्याकडे आला होता. त्यात अश्लील काही नव्हतं; पण त्यात काही सीन्स होते जे मला सोयीचे वाटत नव्हते. मी कधीच स्विमिंग कॉस्च्युम घालत नसे. मी त्यासाठी नकार द्यायचे. अगदी ‘प्रेम कैदी’च्या बाबतही हेच झालं. ज्या चित्रपटातून लोलो (करिश्मा कपूर) लाँच झाली तो चित्रपट मला पहिल्यांदा ऑफर करण्यात आला होता; पण त्यातल्या ड्रेसच्या चेनच्या सीनमुळे मला अस्वस्थ वाटत होतं,” असं रवीना म्हणाली. रवीना अलीकडे केडीएफ : चॅप्टर 2 या चित्रपटामध्ये दिसली होती. येत्या काळात ती संजय दत्तसोबत ‘घुडचढी’मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे अरबाज खानचा ‘पटना शुक्ला’ नावाचा चित्रपटही आहे. तिनं नेटफ्लिक्सच्या अरण्यक सीरिजमधून स्ट्रीमिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या