मुंबई, 21 मार्च : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला coronavirus आता जगभरातील इतर देशांसोबतच भारतातहीवेगानं पसरत आहे. आतापर्यंत देशभरात या व्हायरसचे 271 रुग्ण आढळून आले आहे. ज्यातील 63 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवलं आहे. सध्या सर्वजण त्यांच्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. अशात अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती ट्रेनची सीट साफ करताना दिसत आहे. रवीना टंडननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती मास्क लावून ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये रवीनानं लिहिलं, ट्रेन सुरु होण्याआधीच ओल्या वाइप्स आणि सॅनेटायझरच्या मदतीनं केबिन किटाणू विरहित करत आहे. ज्यामुळे आम्ही कम्फर्टेबल होऊ. नंतर सॉरी बोलण्यापेक्षा आधीच सुरक्षित राहणं अधिक चांगलं असतं नाही का? अधिक गरजेचं असेल तरच प्रवास करा अन्यथा घरी राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. Coronavirus मुळे शूटिंग बंद, भाईजान करतोय बागेत काम; पाहा VIDEO
रवीना टंडनचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून त्यावर अनेक युजर्स कमेंट करताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसमुळे लोकांचं प्रचंड नुकसान होत आहे. आतापर्यंत भारतात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवण्यात आलं असून सर्व सेलिब्रेटी सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असल्यानं सेलिब्रेटींमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनिल कपूर लवकरच होणार आजोबा? सोनमच्या त्या फोटोंमुळे होत आहे Pregnancy ची चर्चा Coronavirus Outbreak दरम्यान सोनाक्षी करतेय पार्टी? Video पाहून नेटिझन्स भडकले