मुंबई, 8 जुलै : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना (Rashmika mandanna) रश्मिकाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: the rise)या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर फक्त दाक्षिणात्य नाही तर बाॅलिवूडमध्येही रश्मिकानं आपली वेगळी अशी छाप पाडली आहे. पुष्पाच्या यशानंतर तिला बाॅलिवूडमधूनही ऑफर्स (Rasmika mandanna bollywood debut) यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तीचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. अशातच रश्मिका मंदानाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘मिशन मजनू’ (Mission majanu movie)या चित्रपटातून रश्मिका मंदाना बाॅलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्राही(Sidharth malhotra) दिसणार आहे. अशातच रश्मिकाच्या हाती आणखी एक बाॅलिवूड चित्रपट लागल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये ती अभिनेता टायगर श्राॅफसोबत (Tiger shroff) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, बॉलीवूड दिग्दर्शक शशांक खेतानने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशी (Dharma production) त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली आहे. रिपोर्टनुसार, करण जोहर आणि शशांक खेतानच्या या आगामी प्रोजेक्टमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हेही वाचा - Sonalee Kulkarni news: ट्रोलर्सवर सोनालीचा संताप, म्हणाली ‘तुमची अशी भाषा कशी…’ निर्मात्यांनी टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदानाची फ्रेश जोडी निवडली आहे. लवकरच ते याविषयी अधिकृत घोषणा करतील. त्यामुळे या दोघांना एकत्रित पाहण्यासाठी चाहते उत्सुक असणार आहे. ही फ्रेश जोडी चाहत्यांच्या किती पसंतीस उतरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, रश्मिका सध्या पुष्पा 2, गुड बाय आणि मिशन मजनूच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबत ती काॅफि विथ करणच्या 7व्या सिझनमध्येही दिसणार आहे. नॅशनल क्रॅशला बाॅलिवूडमध्ये पाहण्यासाठी सध्या अनेक चाहते उत्सुक आहेत.