JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर सिंगला 'या' अभिनेत्रीमुळं बॉलिवूडमध्ये मिळाला पहिला सिनेमा, मात्र दोघांनीही एकत्र केलेलं नाही काम

रणवीर सिंगला 'या' अभिनेत्रीमुळं बॉलिवूडमध्ये मिळाला पहिला सिनेमा, मात्र दोघांनीही एकत्र केलेलं नाही काम

मुंबई, 22 फेब्रुवारी- रणवीर सिंग बॉलवूडमधील यशस्वी अभिनेत्यापैकी एक आहे. रणवीर त्याच्या अभिनया इतकाच त्याच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. रणवीरला जरी अभिनयाचा वारसा नसला तरी त्यांने बॉलिवूडमध्ये याच अभिनयाच्या जीवावर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेटफ्लिक्सच्या ‘द रोमांटिक्स’ या शोमध्ये रणवीर सिंगने एक त्याच्या फिल्मी करिअरबद्दल मोठा खुलासा केला आहे. रणवीर सिंगने त्याला बॉलिवूडमध्ये कुणामुळं एंट्री मिळाली याबद्दल नुकतच सांगितलं आहे. रणवीर सिंगने नेटफ्लिक्सच्या ‘द रोमांटिक्स’ या शोदरम्यान सांगितलं की, बॉलिवूडमध्ये त्याला पहिला ब्रेक मिळवून देण्याला अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा हात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी- रणवीर सिंग बॉलवूडमधील यशस्वी अभिनेत्यापैकी एक आहे. रणवीर त्याच्या अभिनया इतकाच त्याच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. रणवीरला जरी अभिनयाचा वारसा नसला तरी त्यांने बॉलिवूडमध्ये याच अभिनयाच्या जीवावर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेटफ्लिक्सच्या ‘द रोमांटिक्स’ या शोमध्ये रणवीर सिंगने एक त्याच्या फिल्मी करिअरबद्दल मोठा खुलासा केला आहे. रणवीर सिंगने त्याला बॉलिवूडमध्ये कुणामुळं एंट्री मिळाली याबद्दल नुकतच सांगितलं आहे. रणवीर सिंगने नेटफ्लिक्सच्या ‘द रोमांटिक्स’ या शोदरम्यान सांगितलं की, बॉलिवूडमध्ये त्याला पहिला ब्रेक मिळवून देण्याला अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा हात आहे. आज तो बॉलवूडमध्ये एक यशस्वी अभिनेता आहे, यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका भूमी पेडणेकरची असल्याचे तो सांगतो. असं जरी असलं तरी दोघांनी आजपर्यंत एकादाही एकत्र काम केलेलं नाही. वाचा- ह्रता दुर्गुळे लवकरच करणार मोठी घोषणा, सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती कशी झाली रणवीर सिंगची स्क्रीन टेस्ट यावेळी रणवीर म्हणाला की, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी त्याला पाहिल आणि त्याचा फोटो आदित्या चोप्रा यांना दाखवला. निर्मात्यांना तो म्हणाव इतका गुड लुकिंग वाटला नाही. मात्र केवळ शानूच्या सांगण्यावर रणवीर सिंगची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. स्क्रीन टेस्टच्या आधी रणवीरने सांगितले की शानूचे असिस्टेंट त्यांना ब्रीफ करण्यासाठी आली होती. तिचं नाव भूमी पेडणेकर होतं.

संबंधित बातम्या

भूमीमुळे रणवीर सिंगला मिळाला ‘बैंड बाजा बारात’ सिनेमा रणनीवर सिंग पुढे म्हणाला की, भूमिमुळे मी ‘बैंड बाजा बारात’ सिनेमासाठी चांगल्याप्रकारे ऑडिशन देऊ शकलो. ऑडिशन दिल्यानंतर त्यांना मी आवडलो आणि त्याच रात्री मला सिनेमा मिळाला.

14 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे ‘द रोमांटिक्स’ यश चोप्रा यांच्या आठवणीत 14 फेब्रुवारीपासून ‘द रोमांटिक्स’ सिरीज सुरू झाली आहे. याचं दिग्दर्शन स्मृती मूंदड़ा यांनी केलं आहे. यश चोप्रा यांचे भारतीय सिनेमाच्या जडणघडणीत मोठ योगदान आहे. त्यांना रोमांस, प्रेमाचा जनक मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या