रणवीर सिंग
मुंबई, 20 नोव्हेंबर : रणवीर सिंग हा आज बॉलिवूडमधील सर्वात मोठा स्टार आहे यात शंका नाही. या अभिनेत्याने 2010 मध्ये ‘बँड बाजा बारात’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले. रणवीर सध्या अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत दुबईत आहे. एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी होण्यासाठी हा अभिनेता येथे आला होता. नुकतंच रणवीरने ‘फिल्मफेअर मिडल ईस्ट अचीव्हर्स नाइट 2022’ या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्याला या दशकाचा सुपरस्टार म्हणून गौरविण्यात आलं. या सोहळ्याला जान्हवी कपूर, गोविंदा, सनी लियॉनीसारख्या कित्येक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर पुरस्कार स्वीकारताना भावूक होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये, रणवीर सिंग त्याच्या चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच संघर्षाचे दिवस आठवताना भावूक होताना दिसत आहे. तो व्हिडिओमध्ये सांगत आहे की त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या पहिल्या पोर्टफोलिओसाठी 50,000 रुपये कसे दिले. रणवीरच्या या व्हिडिओवर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जण त्याच्यासाठी भावूक होताना दिसले, तर काहींनी अभिनेत्याला ओव्हर अॅक्टिंग असल्याचे सांगत ट्रोल केले. हेही वाचा - Janhvi Kapoor: ‘आई मला बाथरुमचा दरवाजा…’; जान्हवी कपूरने सांगितला श्रीदेवीचा ‘तो’ किस्सा या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतोय कि, ‘पापा तुम्हाला आठवतय का? 12 वर्षांपूर्वी, मी माझा पोर्टफोलिओ पूर्ण करण्याच्या मार्गावर होतो. प्रत्येक स्ट्रगलर ऑडिशन दरम्यान लोकांना ‘इकडे जा, दाखवा की मी चांगला अभिनेता आहे, मला काम द्या’ हे दाखवण्यासाठी एक पोर्टफोलिओ तयार करतो. पोर्टफोलिओचे कोटेशन 50,000 रुपये होते, ते एका मोठ्या फोटोग्राफ्रकडून बनवून घ्यायचे होते. मी माझ्या वडिलांना सांगितले की ते खूप महाग आहे. पण पप्पा म्हणाले काळजी करू नको तुझे वडील आहेत.’’ हे सांगताना रणवीर सिंगच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
रणवीर पुढे म्हणतो- ‘तुला आठवतं मम्मी, छोट्या घरात… माझं ऑडिशन खूप वाईट झालं. मी परत आलो आणि म्हणालो, ‘मामा, माझे स्वप्न पूर्ण होईल की नाही हे मला माहीत नाही.’ रणवीरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यानी मात्र विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ कोणाला आवडला आहे, तर कोणी ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे? असं म्हणत आहे.
रणवीर सिंगच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर तो येणाऱ्या काळात आलिया भट्टबरोबर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात देखील तो दिसणार आहे.