अवघ्या 24 व्या  वर्षी अभिनेत्रीने गमावला जीव

बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माचं निधन झालं आहे.

 अभिनेत्रीचे रविवार 20 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले.

ही बातमी समोर येताच अभिनेत्रीच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 एंड्रिला शर्माने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एंड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. 

 एंड्रिलाने दोन वेळा कॅन्सरशी लढा दिला होता.

अभिनेत्रीला 15 नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता.

 तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. डॉक्टरांनी अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

एंड्रिला कोमात होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली