JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर बनला नीरज चोप्राचा टीचर; या गोष्टीचे देतोय धडे, पाहा VIDEO

रणवीर बनला नीरज चोप्राचा टीचर; या गोष्टीचे देतोय धडे, पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा इंडस्ट्रीतील सर्वांत उत्साही आणि टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेला रणवीर कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो.

जाहिरात

रणवीर सिंह, नीरज चोप्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा इंडस्ट्रीतील सर्वांत उत्साही आणि टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेला रणवीर कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमधे रणवीरसोबत ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता भालाफेकपटू खेळाडू नीरज चोप्राही डान्स करताना दिसत आहे. दोघंही सीएनएन-न्यूज18च्या ‘इंडियन ऑफ द इअर 2022’ या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी एकत्र आले होते. बुधवारी (12 ऑक्टोबर) दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात रणवीर सिंह आणि नीरज चोप्रा दोघेही ‘इंडियन ऑफ द इअर 2022’ पुरस्काराचे मानकरी ठरले. 1983च्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमधील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित, 83 या चित्रपटात रणवीरने माजी कॅप्टन कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. कपिल देव यांचा अप्रतिम अभिनय केल्यामुळे रणवीरला ‘इंडियन ऑफ द इअर 2022’ पुरस्कार देण्यात आला. कपिल देव यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर, भालफेक खेळात उल्लेखनीय कामगिरीसाठी नीरज चोप्राला गौरवण्यात आलं. या वेळी सूत्रसंचालकानं रणवीर आणि नीरजला एकत्र डान्स करण्याची विनंती केली. हेही वाचा -  प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये भावूक झाली उर्फी जावेद, नक्की काय झालं? सुरुवातीला नीरज चोप्रा डान्स करण्यासाठी कचरत होता मात्र, रणवीरसिंगनं प्रोत्साहन दिल्यानंतर त्याने डान्स केला. या वेळी रणवीर नीरजचा डान्स टिचरही झाला. त्याने आपल्या ‘सिंबा’ चित्रपटातील ‘मेरावाला डान्स’ या गाण्यावर नीरज चोप्राला डान्स शिकवला. दोघांच्या डान्सला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

संबंधित बातम्या

यानंतर रणवीरने मिश्किलपणे नीरजची शाळा घेतली. रणवीर म्हणाला, ‘‘तुम्ही नीरजला अॅड्समध्ये अॅक्टिंग करताना बघितलंय का? त्याला बघून आनंद होतो. मला असं वाटतं नीरजच्या बायोपिकमध्ये तो स्वत:च आपली भूमिका करेल". रणवीरच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. या शिवाय रणवीरने नीरजला काही प्रश्नही विचारले. ‘चॅम्पियन होण्यासाठी काय करावं लागेल?’, या प्रश्नांचं उत्तर देताना नीरज म्हणाला, “जेव्हा तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही तेव्हा तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल आणि 100टक्के प्रयत्न करावे लागतील.”

याच कार्यक्रमात रणवीरसिंगने 83चित्रपटाच्या शुटिंगबद्दलचे काही किस्से सांगितले. कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केले, याबद्दलही तो बोलला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या