JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ढोलिडा' गाण्यावर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींचा भन्नाट डान्स, Video वर होतोय कमेंटचा वर्षाव

'ढोलिडा' गाण्यावर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींचा भन्नाट डान्स, Video वर होतोय कमेंटचा वर्षाव

ढोलिडा ( dholida song ) या गाण्यावर स्टार प्रवाह वहिनीवरील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी थिरकण्याचा मोह आवरला नाही. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मार्च- आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील आलियाचे ढोलिडा  ( dholida song ) हे गाणं सध्या चांगलच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य ते कॉमन मॅन प्रत्येक जण या गाण्यावर रील्स बनवताना दिसत आहेत. स्टार प्रवाह वहिनीवरील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी देखील या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. ‘रंग माझा वेगळा’ (rang maza vegla) मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे ( reshma shinde ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर तिच्या रील्सची नेहमी चलती असते. आता रेश्माला साथ मिळाली आहे की स्वामिना मालिकेत पल्लीवीची भूमिका साकारणाऱ्या पूजा बिरारीची ( pooja birari )  . पूजा देखील सोशल मीडिया प्रचंड सक्रीय असते. दोघींनी एकत्र येत आलिच्या भट्टच्या ढोलिडा या गाण्यावर भन्नाट असा डान्स केला आहे. चाहत्यांना देखील या दोघींचा डान्स फलताच आवडला आहे. मोती रंगाच्या साडीत दोघी खूपच सुंदर दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.

संबंधित बातम्या

एकानं म्हटलं आहे की, क्या बात हे ….दीपा आणि शिर्शेकर आता इथे पण काही कमी नाहीयेत 😂 तर एकानं म्हटलं आहे की, दोघीही रॉक..अशा अनेक कमेंट त्यांच्या या डान्स व्हिडिओवर आल्या आहेत वाचा- ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत एंट्री घेणारा अमित नक्की आहे तरी कोण? रेश्मा आणि पूजा सोशल मीडियावर व्हायरल होणारा एकही ट्रेंड सोडत नाहीत. दोघींही नवीन गाणं आलं की त्यावर लगेच रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. यावेळी दोघींनी एकत्र येत ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर डान्स करत ट्रेंड फॉलो केला आहे.यापूर्वीही रेश्मा आणि पल्लवीनं एकत्र डान्स केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या