JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का? आयेशाच्या रि-एंट्रीवर प्रेक्षकांनी केलं ट्रोल

Rang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का? आयेशाच्या रि-एंट्रीवर प्रेक्षकांनी केलं ट्रोल

मालिकेच्या बदललेल्या कथानकावरून मालिकेला बऱ्याचदा ट्रोल केलं गेलं होतं. मात्र आता आयेशाच्या रि-एंट्रीनं मालिका पुन्हा ट्रोल झाली आहे.

जाहिरात

rang majha vegla

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  11 एप्रिल: स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेनं नुकतेच 1000हजार भागांचा टप्पा गाठला आहे. मालिकेचं कथानक 14 वर्षांनी पुढे सरकलं आहे. दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात लुडबुड करणाऱ्या आयेशाला जेल होते आणि इतके सुखासुखी सुरू झालेल्या दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मालिकेतून आयेशा हे पात्र त्याक्षणी संपलं होतं. पण आता 14 वर्षांनी पुन्हा एकदा आयेशाची रि-एंट्री होणार आहे. कार्तिक 14 वर्ष जेलमध्ये असताना इकडे आयेशा देखील जेलमधून बाहेर येते. अनेक वर्षांनी कार्तिक समोर आल्यानंतर आयेशाची काय हालत होते हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे कथानक पुढे सरकताना आणखी ट्विस्ट देखील येणार आहे. आयेशाच्या रि-एंट्रीनं रंग माझा वेगळा मालिकेत आणखी एका विलनची वाढ झाली आहे. आधीच कार्तिक , कार्तिकी, श्वेता दीपाच्या विरोधात दाखवण्यात आले आहेत. आता यात आयेशाची देखील भर पडणार आहे. प्रेक्षकांच्या मात्र ही गोष्ट चांगलीच लक्षात आली आहे. मालिकेच्या बदललेल्या कथानकावरून मालिकेला बऱ्याचदा ट्रोल केलं गेलं होतं. मात्र आता आयेशाच्या रि-एंट्रीनं मालिका पुन्हा ट्रोल झाली आहे. हेही वाचा - असा साजरा झाला निवेदिता सराफ यांचा 60वा वाढदिवस; अशोक मामांबरोबरचे ते क्षण कॅमेरात कैद मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात कार्तिक रस्त्या ओलांडत असताना गाडीतून आयेशा तिला पाहते. कार्तिक कार्तिक ओरडत ती त्याच्या मागे पळते. तेवढ्यात आर्यन तिथे येतो आणि मावशी तिथे कार्तिक अंकल नाहीये असं म्हणून तिला पुन्हा गाडीत बसवतो.  म्हणजेच आर्यन हा आयेशाच्या बहिणीचा मुलगा असल्याचं देखील इथे समोर आलं आहे. तर आयेशाचा देखील संपूर्ण लुक बदलण्यात आला आहे. आशेषाचं लग्न देखील झालं आहे. आता तिनं कोणाबरोबर लग्न केलं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे मावशीवर झालेल्या अन्यायाचा बदला आर्यन कसा घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

संबंधित बातम्या

मालिकेच्या या प्रोमोनंतर प्रेक्षकांनी मात्र चांगलंच ट्रोल केलंय. एका युझरनं लिहिलंय,  वाटलंच होतं की असंच काहीतरी होणार. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, आधीच विलन कमी होते का?आयेशा, श्वेता, कार्तिक, कार्तिकी.

मालिकेत अभिनेत्री विदिशा म्हसकरनं आयेशा हे पात्र साकारलं आहे. विदिशानं साकारलेल्या आयेशाचं प्रेक्षकांनी वेळोवेळी कौतुक केलं आहे. तिनं उत्तमरित्या आयेशा साकारली आहे. रंग माझा वेगळा मधून ब्रेक घेतल्यानंतर विदिशा झी मराठीवरील छत्तीस गुणी गोडी या मालिकेत दिसत आहे. तिथेही ती निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. आता रंग माझा वेगळा मधील रि-एंट्रीमुळे दोन्ही मालिकेत विदिशाची खलनायिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या