अरुण त्रिवेदी
मुंबई, 17 जून : दिग्दर्शक ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट सलग चौथ्या दिवशीही वादात सापडला आहे. आता या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. इतकेच नाही तर आदिपुरुषच्या निर्मात्यांना तुरुंगात टाकण्याची मागणीही काही लोकांनी केली आहे. चित्रपटातील टपोरी संवाद आणि तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप लोकांनी केला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतला सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आदिपुरुष चित्रपट पाहून प्रेक्षक आता रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायण मालिकेचं कौतुक करत आहेत. ३६ वर्षांपूर्वी आलेली ही मालिका आदिपुरुषच्या तुलनेत खूप वरचढ आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. याच्याशीच संबंधित एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सुमारे 4 दशकांपूर्वी टीव्हीवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायणात रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरुण त्रिवेदी यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली असतील, पण हे पात्र साकारण्याचे प्रायश्चित्त त्यांनी आयुष्यभर घेतले. अरुण त्रिवेदी हे स्वतःही रामभक्त होते. पण त्यांनी रावणाच्या भूमिकेत इतका जीव ओतला की खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना रावणच मानू लागले होते. पण अरुण त्रिवेदी यांना मात्र रावणाची भूमिका साकारताना खूप कष्ट घ्यावे लागले. रामभक्त असल्या कारणाने मालिकेतील रामाला अभिनय करतानाही वाईट बोलताना त्यांना दुःख व्हायचं.
याच गोष्टीच प्रायश्चित्त अरुण त्रिवेदी शेवट्पर्यंत करत राहिले. त्यांच्या घराच्या भिंतीवर रामायणाची चौपई लिहिलेली होती. इतकंच नाही तर अरुण त्रिवेदी यांनी त्यांच्या घरी राम दरवार लिहून घेतलं होतं. या मालिकेत माता सीतेचे अपहरणाचा सीन शूट केल्यानंतर अरुण त्रिवेदी यांनी श्रीरामांची माफी मागत प्रायश्चित्त केलं होतं. Adipurush Controversy: वाद वाढला, अयोध्येतील संतांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप; चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मालिका पाहताना सीता हरणाचा एक व्हिडीओ अरुण त्रिवेदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. ज्यात सीता हरणाचा प्रसंग पडद्यावर रंगतो आणि समोर बसलेल्या अरुण त्रिवेदींच्या डोळ्यात अश्रू तरळतात. अरुण त्रिवेदी यांनी या सीनबद्दल जाहीरपणे लोकांची माफी मागितली होती आणि अभिनय आणि व्यक्तिरेखेसाठी जरी मला हे करावे लागले असले तरी त्यांना आयुष्यभरासाठी पश्चाताप होतो असे सांगितले होते. माता सीतेला मोठ्या आवाजात हाक मारण्याचे प्रायश्चित्त अरुण यांनी आयुष्यभर घेतले. दरम्यान, रामायण मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या मुलाने देखील आदिपुरुष बद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रेम सागर यांनी दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’मध्ये प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणाचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल टोमणा मारला होता. एका मुलाखतीत प्रेम सागरने सांगितले की, ‘मी चित्रपट पाहिला नाही, पण टीझर आणि ट्रेलर पाहिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रेम सागर म्हणाले की, ‘माझे वडील रामानंद सागर यांनीही ‘रामायण’ बनवताना स्वातंत्र्याचा वापर केला, परंतु त्यांना भगवान राम समजले होते. अनेक ग्रंथ वाचून त्यांनी त्यात किरकोळ बदल केले पण वस्तुस्थितीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न कधी केला नाही.’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.