JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rama-Raghav: बोल्ड रमाला टक्कर देणार हुशार राघव; हा अभिनेता दिसणार लीड रोलमध्ये

Rama-Raghav: बोल्ड रमाला टक्कर देणार हुशार राघव; हा अभिनेता दिसणार लीड रोलमध्ये

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेतून ऐश्वर्या शेटे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हापासूनच राघवच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता या अभिनेत्याचा चेहरा देखील समोर आला आहे.

जाहिरात

'रमा राघव'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जानेवारी :  सध्या छोट्या पडदयावर बऱ्याच नवीन मालिका सुरु होत आहेत. नवीन वर्षात बऱ्याच जुन्या मालिका संपून नवीन मालिका सुरु होणार आहेत. कलर्स मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. एकीचं नाव आहे ‘रमा राघव’ तर दुसऱ्या मालिकेचं नाव आहे ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’. या दोन्ही मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. दोन्ही मालिकांच्या प्रोमोने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. हे प्रोमो चांगलेच व्हायरल होत आहेत. तसंच या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे चेहरे देखील समोर आले आहेत. या दोन्ही नव्या सुरु होणाऱ्या मालिकांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ‘रमा राघव’ या मालिकेची. अभिनेत्री ऐश्वर्या शेटे या मालिकेत रमाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याआधी फुलाला सुगंध मातीचा’  या मालिकेत काम केलं आहे. कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेतून ऐश्वर्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हापासूनच राघवच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता या अभिनेत्याचा चेहरा देखील समोर आला आहे. हेही वाचा - Madhavi Nemkar: नेहमी साडीत दिसणाऱ्या शालिनी वहिनींचा बोल्ड अवतार; फोटो पाहून चाहत्यांनी दिली ही रिऍक्शन ‘रमा राघव’ या मालिकेत राघवची भूमिका अभिनेता निखिल दामले साकारणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. निखिलने याआधी झी युवा वाहिनीवरील ‘अल्मोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता बऱ्याच काळानंतर तो पुन्हा रमा राघव मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याला आता नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

रमा राघव ही मालिका नव्या वर्षात म्हणजेच 9 जानेवारी 2023 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रात्री 9 वाजता मालिका प्रेक्षकांना पाहता येईल. रमा राघव या कलर्स मराठीच्या नव्या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो समोर आला आहे. याआधी ऐश्वर्याचा पहिला लुक समोर आला होता. मालिकेत रमा ही पैजेवर जग जिंकणारी मुलगी आहे. तिला मिस अँडिट्यूड, बोल्ड अँड ब्युटिफुल म्हणतात. तर राघव हा खूप गुणी, सदाचारी, अभ्यासू, सगळ्यांचा आदर्श असणारा मुलगा आहे. अशी ही रमा राघवची जोडी प्रेक्षकांना किती आवडणार हे मालिका सुरू झाल्यानंतर पाहाला मिळेल.

निखिलच्या  नव्या मालिकेचा प्रोमो पाहून अनेक कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्यात. गौरी कुलकर्णी, प्रिया मराठे, अक्षय वाघमारे या कलाकारांनी कमेंट करत निखिलला शुभेच्छा दिल्या आहेत.  प्रेक्षकांनीही त्याला नव्या रुपात पाहून मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या