राखी सावंत
मुंबई, 28 जानेवारी : राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देत होती. पण आज अखेर शनिवारी 28 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. आज रात्री 8 वाजून 32 मिनिटांनी जुहू येथील सिटीकेअर रुग्णालयात राखीच्या आईने अखेरचा श्वास घेतला. राखीने याविषयीची माहिती दिली आहे. अखेरच्या क्षणांमध्ये राखी आईसोबतच होती. या महिन्याच्या सुरुवातीला राखीने आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगितले होते. तसेच जया यांची प्रकृती गंभीर असल्याचंही ती म्हणाली होती. जया यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिग बॉस मराठी 4 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तिने आई आयसीयूमध्ये असल्याचं सांगितलं होतं. राखीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना चाहत्यांना तिच्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. तिने लिहिले होते की, ‘आई रुग्णालयात आहे. तिची तब्येत बरी नाही तिच्यासाठी प्रार्थना करा.’ पण आज अखेर तिच्या आईने जगाचा निरोप घेतला आहे. हेही वाचा - Urfi Javed: उर्फीने हद्दच केली; थेट किंग खानलाच घातली लग्नाची मागणी; म्हणाली ‘मला तुझी दुसरी बायको…’ गेल्या काही दिवसांपासून राखीची आई जया भेडा रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक होती. अशा परिस्थितीत राखी आईसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होती. नुकतीच तिने आई बरी व्हावी म्हणून कौतुकास्पद पाऊल उचललं होतं. राखीने आईसाठी एनजीओमधल्या मुलांना चिप्स, कुरकुरे आणि लेसचे पॅकेट वाटले होते.
एवढंच नाही तर तिने 500 रुपयांच्या नोटा देखील वाटल्या होत्या. आणि आईसाठी प्रार्थना करायला सांगितले होते. “प्रार्थना आणि औषधामुळेच माणसाला वाचवता येते.’ असं म्हणत राखी रडली देखील होती.आता एकीकडे राखीच्या सुखी जीवनाची सुरुवात झाली असली तरी आईने मात्र तिची साथ सोडली आहे. राखीच्या कुटुंबातून तिला आईची साथ होती, पण तिच्या निधनाने आता राखी एकटी पडली आहे. राखीच्या आईच्या निधनावर चाहते शोक व्यक्त करत आहेत.
राखी सावंतच्या आईला ब्रेन ट्युमर होता. तिची आई काही वर्षांपासून आजारी होती. राखी ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ मधून बाहेर पडताच तिला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली. मुकेश अंबानी आईच्या उपचारात मदत करत असल्याचंही राखी सावंतने म्हटलं होतं. नुकतेच मुंबईत आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले होते. महिला मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखीची चौकशी केली. दिवसभर चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले.