राखी सावंत
मुंबई, 17 जुलै : राखी सावंतला आज कोण ओळखत नाही. ‘ड्रामा क्वीन’ राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राखी सावंत नुकतीच दुबईहून भारतात परतली आहे. आता राखी दररोज सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधते. दरम्यान, राखीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिची कार सोडून मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोमध्ये फिरताना दिसत आहे. एवढंच नाही तर तिने रिक्षात फिरण्याचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. एका जवळच्याच व्यक्तीनं राखीची फसवणूक केली आहे. यासाठी तिने पोलिसांकडेही धाव घेतली आहे. राखी सावंतच्या आयुष्यात अनेकदा काही ना काही उलथापालथ पाहायला मिळते. यावेळीही असेच काहीसे घडले. राखी सावंतने पापाराझीशी बोलताना, तिचा ड्रायव्हर तिच्या गाडीची चावी घेऊन पळून गेला आहे. यासोबतच तो तिचा सोन्याचा फोन आणि पैसे चोरून पळून गेला असल्याचं सांगितलं आहे.
आता राखीची महागडी गाडी, सोन्याचा फोन आणि पैसे या गोष्टी चोरीला गेल्या आहेत हे उघड झालं आहे. या घटनेनंतर राखी खूपच अस्वस्थ झाली आहे. तिच्यावर नेहमीच कुठली ना कुठली संकटं येत असतात. ती म्हणाली की तो कुठेही जाऊन दे, कोणत्याही ग्रहावर जाऊन बसून देत.’ एकेकाळी दिले हिट सिनेमे, आता करावा लागतोय साईड रोल; खंत व्यक्त करत म्हणाली ‘काळ बदलला…’ राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे,“माझ्या ड्रायव्हरने पैसे चोरी केले आहेत. फोन आणि बीएमडबल्यू कार घेऊन तो फरार झाला आहे. माझ्याकडे त्याचं आधार कार्ड सुद्धा नाही. गरीब म्हणून मी त्याच्यावर विश्नास ठेवला होता. पण आता मीच अडचणीत आले आहे”.
ती म्हणाली की, ‘तो गरीब असल्याचे समजून मी त्याला कामावर ठेवले आणि तो सर्व सामान घेऊन पळून गेला. त्याची बहीण तिच्या घरी काम करते असेही तिने सांगितले. राखीचे म्हणणे आहे की ती उत्तर प्रदेशातील पप्पू यादवविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलिस ठाण्यात जात आहे. राखी सावंत म्हणाली की, मी चांद्रयान चंद्रावर गेल्याचा आनंद साजरा करत होते आणि नेमकं त्याचवेळी पप्पू यादवने माझ्या आयुष्याला ग्रहण लावले. राखीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून तिच्या या व्हिडिओवर युजर्स आता कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, मॅडम तो चंद्रावर गेला आहे. दुसऱ्याने लिहिले की, राखीने त्याला पगार दिला नसेल हे नक्की म्हणून तो तिची गाडी आणि पैसे घेऊन फरार झाला.