मुंबई 16 जुलै**:** बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. (Rakhi Sawant marriage controversy) राखीनं स्वत:ची तुलना चक्क सलमान खानशी करत लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे. तिनं दिलेलं हे उत्तर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. राखीनं आलिकडेच आपल्या एका खास मैत्रीणीच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत लग्न न करण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “तुम्ही माझ्या लग्नाच्या मागे का पडला आहात? सतत तुम्ही मला तोच तोच प्रश्न विचारता. मी आणि सलमान खान आम्ही सिंगल आहोत ते तुम्हाला बघवत नाही का? लग्न करून काय मिळणार? मी एकदा प्रयत्न केला पण मला काय मिळालं ठेंगा.. मी लग्न करत नाहिये कारण मला करायचंच नाही. मला सिंगल राहून माझं स्वातंत्र्य उपभोगायचं आहे.” सरू आजींनी अश्लील शिव्या घातल्या? व्हायरल व्हिडीओमुळे ‘देवमाणूस’वर बंदीची मागणी
Samantar नं रचला इतिहास; पहिल्यांदाच मराठी वेब सीरिजनं नोंदवला विक्रम राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला 50 रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.