JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'लग्नाशिवाय आम्ही....' बॉयफ्रेंड आदिलसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच राखी सावंत म्हणाली असं काही

'लग्नाशिवाय आम्ही....' बॉयफ्रेंड आदिलसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच राखी सावंत म्हणाली असं काही

राखी सावंतचा नुकताच रितेशसोबत घटस्फोट झाला आहे. अशातच राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय. अखेर राखीनं यावर आता मौन सोडलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून :  ड्रामा क्विन राखी सावंत नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बाॅसमुळे राखी (Rakhi Sawant In Bigg Boss) चांगलीच प्रकाशझोतात आलेली पहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान (Rakhi Sawant Boyfriend  Name ) याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय. यावर आता राखीनं अखेर मौन सोडलं आहे (Rakhi Sawant leaves silence on marriage with boyfriend Adil). नुकतचं राखीला तिच्या आणि आदिलच्या **(Rakhi Boyfriend Adhil Khan)**लग्नाविषयी विचारण्यात आलं. यावर राखी म्हणाली की, ‘हे सर्व आदिलवर अवलंबून आहे. मी एकदाच लग्न  केलं आणि  ते करून मी काय केलं ..असा प्रश्न  देखील ती लग्नाबद्दल यावेळी उपस्थित करताना दिसली.  ती पुढे म्हणाली की,  लग्नाशिवायही आम्ही आनंदी आहोत, आम्ही दोघे एकत्र आहोत आणि सर्व काही ठीक चालले आहे. आम्ही एकत्र काम करू आणि व्यवसाय चालवू. आम्हा दोघांना चित्रपट, गाणी आणि वेब सिरीजच्या ऑफर येत आहेत आणि आम्ही काम करायला तयार आहोत. आदिल इतर कोणत्याही नायिकेसोबत काम करणार नाही. मी त्याची मॅनेजर ( Rakhi Sawant Marriage) आणि नायिका दोन्हीपण आहे.  राखी आणि आदिलचे व्हिडिओ सोशल मीडियावर घालत आहेत धुमाकूळ राखी सावंतचा घटस्फोट झालेला असतानाच तिच्या दुसऱ्या लग्नाच्याही चर्चा सुरु झालेल्या दिसत आहे. त्यामुळे आता हे नवं कपल पुढे जाऊन काय निर्णय घेणार हे पाहणं तितकंच उस्तुकतेचं ठरणार आहे. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे ही वाचा -  सोनम कपूरच्या नवऱ्याने अनुष्का शर्मासाठी पाठवलं खास गिफ्ट,पाहा आहे तरी काय? रितेश आणि राखीचा वाद अद्याप सुरूच राखीने ETimes दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, रितेशचं तिच्यासोबतचं वागणं अजिबात चांगलं नव्हतं. त्यानंतर ती प्रियकर आदिलसोबत रितेशविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. राखीने रितेशवर तिचे सोशल मीडिया आणि मेल अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला होता. आता कायदेशीर पद्धतीचा अवलंब करून पुराव्यासह बोलणार असल्याचे रितेशने सांगितले होते. यासोबतच रितेशने असंही सांगितलं की, गेल्या 3 वर्षांत आपण राखी सावंतवर करोडो रुपये खर्च केले आहेत.

संबंधित बातम्या

राखीनं मात्र रितेश खोटे आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रितेश मला बीएमडब्ल्यू घेण्यासाठी शोरूममध्ये घेऊन गेला. चार लाख रुपयेही दिले होते. पण दुसऱ्या दिवशी त्याने पैसे परत घेतले आणि सांगितले की मी बीएमडब्ल्यूच्या लायक नाही. त्यानंतर त्यांनी मला लाल रंगाची कार दिली. पण जेव्हा आदिलने मला बीएमडब्ल्यू दिली तेव्हा त्यानं मला गाडी परत करण्यास सांगितलं. अद्यापही राखीचे आणि पार्श्वपतीचे आरोप, भांडण सुरुच आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या