JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rakhi Sawant: अदिलच्या कुटुंबीयांविषयी राखीचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली 'त्यांनी त्याचा साखरपुडा...'

Rakhi Sawant: अदिलच्या कुटुंबीयांविषयी राखीचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली 'त्यांनी त्याचा साखरपुडा...'

राखीने आदिलच्या कुटुंबीयांविषयी मोठा खुलासा केला आहे. काय आहे नक्की प्रकरण पाहा.

जाहिरात

राखी सावंत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : राखी सावंत सध्या आपल्या  वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आईचं आजारपण, निधन आणि पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना सामोरं जात आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यावर ऍक्शन घेत पोलिसांनी आदिलला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता राखीने आदिलच्या कुटुंबीयांविषयी मोठा खुलासा केला आहे. आदिल खानला अटक झाल्यानंतरही राखी सावंतने त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. आदिलने तिचे न्यूड व्हिडीओ काढून ते विकले असंही राखी म्हणाली होती. तर आता आदिल पाठोपाठ राखीने त्यांच्या घरच्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने अदिलाच्या घरच्यांना त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड विषयी सगळं माहिती असून ते शांत राहिले असा दावा केलाय. तसंच ते सध्या राखीला साथ देत नाहीयेत असं दुःख तिने व्यक्त केलं आहे. हेही वाचा - Rakhi Sawant: ऐन व्हॅलेंटाईन डे दिवशी एकटी पडली राखी; आदिलआधी ‘या’ व्यक्तींच्या होती प्रेमात मीडियाशी बोलताना राखी  म्हणाली कि, ‘त्याच्या कुटुंबीयांनी तरी मला पाठिंबा द्यायला हवा. आदिल तर मला सपोर्ट करत नाहीये. आता मी न्याय मागायला कोणाकडे जाऊ? कुठे जाऊ? आदिलच्या कुटुंबीयांना सगळं माहीत होतं. आमच्या रजिस्टर लग्नाबद्दल मी त्यांना आठ महिने आधीच सांगितलं होतं. त्याचबरोबर सगळी कागदपत्रंही दिली होती. त्याच्या काकूपासून त्याच्या आईपर्यंत सगळ्यांना याबद्दल माहीत होतं. तरीही त्यांनी आदिलचा दुसरा साखरपुडा केला.’

संबंधित बातम्या

पुढे ती म्हणाली, ‘मी आदिलचे वडील, त्याची आई, त्याची काकू कोणाशीही फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तर ते माझा फोन कट करतात. तुम्हाला काय वाटतं मी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे तर आम्ही बॉलिवूडवाले काय खोटं बोलतो? म्हैसूरमधील एका मुलीने आदिलविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. तिच्यावर अन्याय झाला आहे. ती मुलगी तर सर्वांसमोरही आलेली नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत.’

पुढे ती म्हणतेय कि, ‘आज नाहीतर उद्या आदिलला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट नक्की मिळणार. मला न्याय मिळो आणि आदिलला जामीन न मिळो अशी तुम्ही प्रार्थना करा.’ तसेच सूर्य एका व्हिडिओमध्ये राखी तिला अदिलपासून घटस्फोट नको आहे असं देखील म्हणतेय. राखीच्या लग्नाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असून  आता तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. राखी आणि अदिलचं हे प्रकरण किती पुढे जातंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या