राखी सावंत
मुंबई, 12 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आईचं आजारपण, निधन आणि पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना सामोरं जात आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यावर ऍक्शन घेत पोलिसांनी आदिलला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता आदिलच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. राखी सावंतने तनु चंदेलचे नाव घेऊन ती आदिलची गर्लफ्रेंड असल्याचा खुलासा केला होता. आता राखी सावंतने तनु चंदेल गर्भवती असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. राखी सावंतने पती आदिल खानविरुद्ध एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा आरोप केला होता. तनु चंदेल उर्फ निवेदिता हिचं आदिल सोबत अफेअर असल्याचा दावा तिनं केला होता. आता राखीने अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. हेही वाचा - Bigg Boss 16 finale: बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात; विजेतेपदाच्या शर्यतीतून ‘हा’ स्पर्धक बाहेर? नुकताच राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने ‘तनू चंदेल प्रेग्नंट असल्याचे ऐकले आहे. म्हणूनच आदिल बाहेर येऊन लग्न करणार आहे.’ असं म्हटलं आहे.
राखी सावंतने पापाराझीशी बोलताना आदिलला जामीन मिळाला नसल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘मला आश्चर्य वाटते. आधी लग्नाची बातमी आणि आता निवेदिता तनु चंदेल प्रेग्नंट आहे. तेव्हा तिचं लग्न होणार होतं. तनुने बाहेर येऊन सांगावे की ती गरोदर आहे की नाही. मला आभार मानायचे आहेत मुंबई आणि म्हैसूर पोलीस यांचे. ज्यांनी आदिल विरुद्ध बलात्कार प्रकरणाचा पर्दाफाश केला.’
राखी सावंतच्या आरोपानंतर तनु चंदेलने प्रतिक्रिया शेअर केली आहे. राखीने मला या सगळ्यात ओढू नये, अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली होती. मी तुला आणि तुझ्या मित्रांना आधीच सांगितले आहे की मी आदिलसोबत नाही. ही तुझी आणि तुझ्या पतीची वैयक्तिक बाब आहे. कृपया मला या सगळ्यात आणू नका.’ अश्या भावना तनु चंदेलने व्यक्त केल्या होत्या.