राखी सावंत
मुंबई, 19 जानेवारी: मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत राखीवर कारवाई केली आहे. आता राखीवर आरोप करणाऱ्या अभिनेत्री-मॉडेलचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तिने राखीवर गंभीर आरोप केले आहेत. राखीवर आरोप करणारी ही मॉडेल आणि अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा. तिनेच ट्विटरद्वारे राखी सावंतला अटक झाली असल्याची माहिती दिली. अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विटरद्वारे राखी सावंतला अटक झाली असल्याची माहिती दिली. ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’ असं शर्लिनने म्हटलं. हेही वाचा - बिग बॉस नंतर पुन्हा एकत्र दिसणार किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर; ‘हे’ आहे कारण मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्याबाहेरील शर्लिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने राखीबाबत वक्तव्य केलं आहे. ‘ज्यांनी माझं लैंगिक शोषण केलं त्या आरोपींना वाचवण्यासाठी राखी सावंतसारखे लोक प्रयत्न करतात. अशा लोकांना माझी एक विनंती आहे की, आपल्या भावांना पाठिंबा देण्यापूर्वी त्यांना जाऊन विचार ते महिलांचं लैंगिक शोषण का करतात? आज काय झालं? कुठे आहेत तुझे भाऊ? सांग तुझ्या भावांना की इथे येऊन मला यामधून बाहेर काढा.’ असं शर्लिन म्हणत आहे.
शर्लिनच्या या गंभीर आरोपांमुळे राखी गजाआड गेली आहे. आता तिच्यावर पुढे काय कारवाई होणार ते पाहणं महत्वाचं आहे. कोण आहे शर्लिन चोप्रा? शर्लिन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता. तसेच तिने आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं. म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
शर्लिन चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जिने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शर्लिन चोप्रा प्लेबॉय मासिकासाठी न्यूड पोज देणारी पहिली भारतीय महिला आहे. फोटो दोन वर्षांनी प्रसिद्ध झाले. त्यानंतर MTV Splitsvilla या शोच्या सहाव्या सीझनच्या होस्टसाठी तिची निवड झाली. डिसेंबर 2013 मध्ये, तिने “बॅड गर्ल” नावाचा म्युझिक व्हिडीओ रिलीज केला. 2009 मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. तसेच 2013 मध्ये तिने रूपेश पॉल दिग्दर्शित कामसूत्र 3D मध्ये मुख्य नायिका म्हणून काम केले आहे.