मुंबई, 24 ऑगस्ट: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं गेली 10-12 दिवस त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू हे सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती मागच्या काही दिवसांपासून गंभीर आहे. डॉक्टरांची मोठी टीम राजू यांच्यावर लक्ष ठेवून आहे. गेली अनेक मृत्यूशी झुंज देत असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राजू यांच्या मेंदूतील एक नस पूर्णपणे ब्लॉक झाली आहे. मेंदू काम करण्यासाठी महत्त्वाच्या तीन नस असतात त्यातील एक नस ब्लॉक झाल्यानं राजू आता पूर्णपणे कोमामध्ये गेले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या या माहितीमुळे राजू यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आता न्यूरोफिजियोथेरेपीची मदत घेतली जात आहे. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘राजू श्रीवास्तव आजूनही व्हेंटिलेटवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा आहे. राजू यांच्या मानसिक स्वास्थामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील गाणी डायलॉग्स ऐकवण्यात येत आहेत’, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हेही वाचा - Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, समोर आली महत्त्वाची अपडेट राजू श्रीवास्तव यांना प्रार्थनेची गरज संपूर्ण देशाला खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची अपडेट समोर आल्यापासून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशभरातून राजू यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. इतकंच नाहीतर श्रीवास्तव कुटुंबानं देखील राजू यांच्यासाठी घरी पूजा देखील घातली आहे. त्यांना दवा नाही दुआची गरज आहे असं सर्वत्र म्हटलं जात आहे. अगदी सोशल मीडियावरही राजू श्रीवास्तव ट्रेंड होत आहे. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून सतत व्हेंटिलेटरवर आहेत. राजू यांना शुद्धीवर येण्यासाठी आणखी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो असे सांगण्यात आलं आहे. राजू यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा झालेली नाही. काही दिवसांआधी त्यांच्या हाता पायाची हालचाल झाल्याचं दिसलं होतं मात्र त्यानंतर राजू यांची प्रकृती खालावत चालली आहे.