दिल्ली, 23 मे: कॅन्सरच्या विळख्यामुळे 2020 साली चित्रपटसृष्टीने दोन गुणी कलावंत गमावले. आधी इरफान खान (Irrfan Khan) आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor). ऋषी कपूर यांनी आपल्या तारुण्याच्या काळात अनेक रोमँटिक चित्रपट केले. त्यासोबतच त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिकादेखील केल्या. आज ते आपल्यात नाहीत; मात्र त्यांचे चित्रपट आजही आपल्याला त्यांची आठवण करून देतात. ऋषी कपूर हे अत्यंत मनमोकळे आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार होते. ते चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही उत्स्फूर्तपणे बोलत असत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ (Rishi Kapoor Book Khullam Khulla) या त्यांच्या पुस्तकात अनेक मोठे खुलासे केले आहेत. या पुस्तकात त्यांनी वडील राज कपूर (Raj Kapoor) यांच्या अफेअरचाही उल्लेख केला आहे. वडिलांच्या अफेअरमुळे आई कृष्णा कपूरसोबत (Krushna Kapoor) घर सोडल्याचं त्यांनी लिहिलं आहे. याबद्दलचं सविस्तर वृत्त ‘एबीपी न्यूज हिंदी’ने प्रसिद्ध केलं आहे. शोमॅन राज कपूर त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या अफेअरमुळेदेखील बऱ्याचदा चर्चेत असायचे. नर्गिस (Nargis) आणि वैजयंती माला (Vajyanti Mala) या दोन अभिनेत्रींसोबतच्या त्यांच्या प्रेमकथा त्या काळी चित्रपटसृष्टीत खूप चर्चिल्या गेल्या होत्या. वडिलांच्या अफेअरमुळे ऋषी कपूर यांनी आई कृष्णा कपूरसोबत घर सोडल्याचा खुलासाही आपल्या पुस्तकात केला आहे. ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे, की “माझ्या वडिलांचं नर्गिसजींसोबत अफेअर (Rishi kapoor And Vaijayanti Mala Affair) होतं. तेव्हा मी खूप लहान होतो. मला काही कळत नसल्याने त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. तसंच या प्रकरणाला आमच्या घरात कोणाचा विरोध झाल्याचं किंवा त्यावरून भांडण झाल्याचं मला आठवत नाही; मात्र मला एक गोष्ट आठवते. जेव्हा पप्पा वैजयंती माला यांच्यासोबत होते, तेव्हा मी माझ्या आईसोबत घर सोडलं आणि आम्ही मरीन ड्राइव्हवरच्या नटराज हॉटेलमध्ये राहू लागलो.”
VIDEO : ह्रता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात, ‘टाईमपास 3’चा फर्स्ट लुक आला समोरवैजयंती मला आणि राज कपूर यांच्या नात्यामुळे ऋषी कपूर आणि त्यांची आई हे दोघंही खूप दुखावले गेले होते. याबद्दल त्यांनी पुस्तकात पुढे लिहिलं आहे, “ज्या वेळी आम्ही घर सोडलं, त्या वेळी माझ्या आईने ठाम निश्चय केला होता, की ती आता मागे हटणार नाही. त्यानंतर आम्ही दोन महिन्यांसाठी हॉटेलमधून चित्रकूटमधल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी माझी आई आणि आमच्यासाठी हे अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्या काळात माझ्या वडिलांनी आमचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केले; मात्र त्या वेळी माझ्या आईने ठरवलं होतं, की जोपर्यंत या सर्व गोष्टी संपत नाहीत, तोपर्यंत ती हार मानणार नाही.”
VIDEO: ‘बास ग जुया किती हौस तुला’; जुईली जोगळेकरच्या नव्या टॅटूवर नेटकऱ्यांच्या हटके कमेंटवैजयंती माला आणि राज कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना वैजयंती माला यांनी मात्र त्या बातम्यांचं पूर्णपणे खंडण केलं होतं. राज कपूर आणि त्यांच्यामध्ये असं कोणतंही नाते नसून, हे सर्व चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. राज कपूर यांनीदेखील अशीच काही कारणं देऊन या प्रकरणावर पडदा टाकला होता.
वैजयंती माला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे राज कपूर यांच्यासोबत कोणतंही अफेअर नाही आणि त्या हे सर्व केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करत होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर ऋषी कपूर नाराज झाले होते.