JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लॉकडाऊनच्या प्रेमात आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, शेअर केला बिकिनीतील फोटो

लॉकडाऊनच्या प्रेमात आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, शेअर केला बिकिनीतील फोटो

अभिनेत्री राधिका आपटे हिने जुना फोटो शेअर करत समुद्रावरील तिच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 एप्रिल : जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण घरीच राहून बाहेर पडण्याची स्वप्न पाहत आहेत. काहीजण लॉकडाऊनबाबत तक्रार करत तर काहीजण लॉकडाऊन एन्जॉय करत, हे सर्व संपल्यावर काय करणार याची स्वप्न रंगवत आहेत. अगदी करीना कपूरने सुद्धा काही दिवसांपूर्वी सैफ आणि तैमुरबरोबरचा बीचवरील फोटो शेअर केला होता. आता अभिनेत्री राधिका आपटे (Radhik Apate) हिने सुद्धा समुद्रावरील एक फोटो शेअर केला आहे. पोलका डॉट बिकिनीतील तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (हे वाचा- दुबईमध्ये अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी,‘अजान’बाबत वादग्रस्त ट्वीट VIRAL ) ‘लॉकडाऊन खूप आवडत आहे’, अशी कॅप्शन देत राधिकाने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने #dreamingoftheocean असा हॅशटॅग देखील वापरला आहे. बिकिनीतील जुना फोटो शेअर करत तिने समुद्रावरील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. नक्कीच राधिकाप्रमाणे अनेक जण असतील ज्यांना समुद्रावर भटकायची आठवण येत असेल.

दरम्यान सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. राधिका आपटेच्या अनेक फॅन्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत तर खूप जणांनी फोटोवर लाइक केले आहे. (हे वाचा- विकी कौशल, राजकुमार रावची सोसायटी सील; डॉक्टरची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह ) राधिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूरच्या ‘वाह! लाइफ हो तो ऐसी!’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राधिकाने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. नेटफ्लिक्सवर देखील ती विशेष प्रसिद्ध आहे. मांझी, पॅडमॅन, बदलापूर, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये राधिकाने नेहमीच वेगळी भूमिका साकारली आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या