JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे माझं भाग्य' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे माझं भाग्य' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या साकारायला मिळालेल्या शेवंता या भूमिकेबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे- अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाच्या अपडेट देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर चंद्राची क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चंद्राप्रमाणे चंद्रमुखी (Chandramukhi Marathi Movie)  सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकरची  ( amruta khanvilkar ) मैत्रीण शेवंताने देखील सर्वांचे लक्षवेधून घेतले. शेवंताची भूमिका अभिनेत्री राधा सागर  हिनं साकारली आहे. आतापर्यंत राधा सागरला नकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे. पण शेवंताची भूमिका काहीशी वेगळी होती. राधाने  ( radha sagar ) नुकतीच इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. राधा सागरनं अमृता खानविलकरसोबतचा एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, “शेवंता” सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते, “अमृता” बद्दल काय बोलू? ती खूप कमाल आहे ऍक्टर म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा,सेटवर ती सर्वांशी मिळून मिसळून रहायची. सो मला त्यानिमित्ताने एक खूप चांगली मैत्रीण “चंद्रा” च्या रुपात भेटली असं म्हणता येईल. “अमृता” जी काय या फिल्म मध्ये दिसलीय, खूप अप्रतिम. ही गोष्ट,चंद्रा च कॅरेक्टर, “आदिनाथ” चे कॅरेक्टर, सगळ्यांचे अभिनय,कास्टिंग,सगळंच कसं परफेक्ट होतं. आणि आमची भट्टी पण छान जमून आली. ’’ वाचा- ‘योगी आदित्यनाथ यांचा नेमका हेतू काय..’ अभिनेता सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत ‘‘सगळ्यांच्या कॉस्च्युमचे श्रेय मला असं वाटतं “मंजू ताई” कडे जातं. “अजय अतुल” सारखे दिग्गज संगीतकार आणि प्लॅनेट मराठी सारखा तगडा ओ टी टी प्लॅटफॉर्म हे याचे आधारस्तंभ होते.या प्रोजेक्ट ला चार चांद लावले ते म्हणजे “प्रसाददा” आणि “संजय सर.“फिल्म बघताना प्रत्येक फ्रेम काहीतरी मनात घर करून जाते. आणि “प्रसाददा” म्हणजे खरंच खूप टॅलेंटेड सेन्सिबल आणि समोरच्या कडून खूप उत्तम पद्धतीने नॅचरली काम काढून घेण्याची शैली अवगत असलेला असा उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे असं मला वाटतं. सगळ्यांना फिल्म खूप चांगली ब्लॉकबस्टर हिट झाली यासाठी शुभेच्छा. अमू तुझ्या सोबत काम करून खूप छान वाटलं..Love You❤️@amrutakhanvilkar’’

संबंधित बातम्या

सगळ्यात शेवटी राधानं प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचे धन्यवाद देखील मानलं आहेत. तिच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी पोस्ट करत तिचं देखील कौतुक केंल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या