JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / R Madhavan: 'अशा चित्रपटांमध्ये काम करणारे खरोखरच मूर्ख...' आर माधवनने कंगनाबद्दल केलेलं ते वक्तव्य चर्चेत

R Madhavan: 'अशा चित्रपटांमध्ये काम करणारे खरोखरच मूर्ख...' आर माधवनने कंगनाबद्दल केलेलं ते वक्तव्य चर्चेत

कंगना आणि आर माधवनची मैत्री खूपच छान आहे. कंगना आणि आर माधवन यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण आता या अभिनेत्याने कंगनाबद्दल केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

जाहिरात

कंगना आणि आर माधवन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल :  कंगना रनौतला बॉलिवूडची पंगा गर्ल म्हटले जाते. कंगना रनौत स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. ती प्रत्येक बाबीवर तिचे मत स्पष्टपणे मांडते आणि त्याची चर्चा सुरु होते.  म्हणूनच अभिनेत्रीचे इंडस्ट्रीत मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत. पण ज्याच्याशी तिची मैत्री आहे, त्याच्याशी ती खूप आदराने वागते. कंगनाचे बॉलिवूडमध्ये शत्रू जरी जास्त असले तरी तिचा एक जवळचा मित्र देखील आहे. या अभिनेत्यासोबत तिची निखळ मैत्री आहे. हा अभिनेता म्हणजे आर माधवन. कंगना आणि आर माधवनची मैत्री खूपच छान आहे. कंगना आणि आर माधवन यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. आता नुकतेच आर माधवनने कंगना राणौतचे जोरदार कौतुक केले आहे. त्याने कंगना विषयी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

कंगना रनौत आणि आर माधवन पहिल्यांदा तनु वेड्स मनूमध्ये दिसले होते. या चित्रपटात दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. यानंतर दोघेही तनु वेड्स मनु रिटर्न्समध्ये एकत्र दिसले होते. आता अलीकडेच, अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान कंगना राणौतचे जोरदार कौतुक केले आहे. त्याने कंगनाचे वर्णन एक सशक्त महिला असे केले आहे, तर त्याला उत्तर देताना कंगनानेही त्याचं कौतुक केलं आहे. Suniel Shetty: अखेर ‘त्या’ प्रकरणावर सुनील शेट्टींनी सोडलं मौन; जावयाचा बचाव करत साधला करण जोहरवर निशाणा एका मुलाखतीदरम्यान आर माधवनला कंगनाच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिनेता म्हणाला, ‘जर तुम्ही तिच्या सर्व चित्रपटांच्या सर्व प्रमुख नायिका पाहिल्या तर त्या खूप मजबूत आहेत. तिला तिच्या स्वतःच्या घरात काही अतिशय मजबूत महिलांसोबत वाढण्याचे भाग्य लाभले. कंगना किंवा शालिनी किंवा मला ज्या महिलांसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला त्या सर्व आपलं मत परखडपणे मांडणाऱ्या महिला होता.’ आपला मुद्दा पुढे नेत आर माधवन म्हणाला की, ‘कंगना ही एक पुशओव्हर आणि स्टिरियोटाइप अभिनेत्री नाही. ती एक-दोन चित्रपटात येऊन नाचते आणि पुरुषाकडून मर खाऊन निघून जाते अशा प्रकारची ती नाही. जे लोक अशा चित्रपटांमध्ये काम करतात ते खरोखरच मूर्ख असतात.’ कंगनाचे कौतुक करताना आर माधवन म्हणाला, ती खूप हुशार आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. ती खरोखरच एक असामान्य अभिनेत्री आहे आणि आज ती सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काय करत आहे ते पहा. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी अभिनेत्याचा रॉकेट्री हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दुसरीकडे कंगना राणौत लवकरच इमर्जन्सी नावाचा चित्रपट घेऊन येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या