यावर्षी बाफ्टासाठी प्रियंकाने लाल रंगाचा आउटफिट घातला होता. तिच्या या सेक्सी अवताराने लगळ्याचं लक्ष वेधलं होतं.
मुंबई, 17 सप्टेंबर- अभिनेत्री प्रियांका चोप्राचा**(Priyanka Chopra)** ‘द एक्टिविस्ट’ (The Activist) हा नवा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ग्लोबल सिटीजन्सवर आधारित या शोमध्ये प्रियांका चोप्रा, ज्युलियन होप आणि अशर शोचे होस्ट-जज आहेत. मात्र या शोच्या प्रीमियरपासूनचं या शो वर टीका केली जात आहे. बुधवारी या शोच्या मार्फत फॉरमॅटबद्दल मेकर्सनी माफी मागितली होती. तिथे आज अभिनेत्री प्रियांका चोप्रानेसुद्धा पोस्ट करत माफीनामा जाहीर केला आहे.
‘The Activist’ संबंधी नेमका विवाद काय आहे? ग्लोबल सिटीजनवर आधारित या शोचा फॉरमॅट असा आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या ६ वेगवेगळ्या सामाजिक मुद्यांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ऐक स्पर्धा होणार. या कार्यकर्त्यांच्या ऑनलाइन गुंतवणूक, सोशल मीट्रिक तसेच यातून कार्यकर्त्यांना येणारा इनपुट याआधारे शोचा विजेता ठरवला जाणार आहे. तसेच जिंकणाऱ्याला रक्कम आणि G २० शिखर संमेलनात भाग घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र हा शोचा फॉरमॅट पाहून अर्थातच सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा घेण्याच्या कारणावरून या शोवर टीका केली जात आहे. तसेच अनेक युजर्सनी या शोला ‘ब्लॅक मिरर एपिसोड’ इतकंच नव्हे तर ‘जगाचा अंत’देखील म्हटलं आहे. (**हे वाचा:** न्यूयॉर्कमध्ये सुरूय सुहाना खानचा प्रोजेक्ट्? नवा LOOK होतोय VIRAL ) प्रियांका चोप्राने मागितली माफी- प्रियांकाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला माफीनामा जाहीर केला आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे, ‘गेल्या काही आठवड्यांमध्ये मी ‘आवाजा’ची ताकत पाहून आश्चर्यचकित झाले आहे. जेव्हा एखादा मुद्दा एकत्र येऊन उठवला जातो. तेव्हा त्याला नक्क्कीच यश येत. ती गोष्ट ऐकली जाते. तुमचा आवाज ऐकण्यात आला आहे. म्हणूनच शो मेकर्स आणि मीसुद्धा शो च्या या चुकीच्या आराखड्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागते. मी या शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दलसुद्धा मी माफी मागते. मात्र माझा उद्देश फक्त या सामाजिक कर्त्यांसोबत काम करणं आणि त्यांच्या कष्टाला जगासमोर आणणं इतकाच होता. (**हे वाचा:** वेस्टर्न LOOK मध्ये जान्हवी कपूरचा जलवा; युजर्स म्हणाले KILLER ) तसेच प्रियांकानं पुढं म्हटलं आहे, ‘सामाजिक कार्यकर्ता हा एक जगभरातील मोठा वर्ग आहे. हे लोक आयुष्यभर आपलं घाम गाळून रक्ताचं पाणी करून आपल्या सर्वांसाठी राबतात. या लोकांना ओळख मिळायला हवी. त्यांचं काम जगासमोर यायला हवं. तसेच त्यांच्या कामाला फक्त ओळखलं जाऊ नये तर त्यांच्या कष्टाचा आनंदोस्तव साजरा करायला हवा’. अशा शब्दात प्रियांका चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.