मुंबई, 02 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून ग्रॅमी अवॉर्डमध्ये घातलेल्या ड्रेसमुळे चर्चेत आहे. या अवॉर्ड सोहळ्यातील प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या ड्रेसमुळे तिला खूप ट्रोल व्हावं लागलं. पण प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना याविषयी विचारण्यात आलं असता त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर आता प्रियांकानं त्या रिव्हिलिंग ड्रेसचं सिक्रेट सांगितलं आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणाऱ्या दीपिकानं नुकताच एका मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं बहुचर्चित रिव्हिलिंग ड्रेसचं सिक्रेट उघड केलं. त्या ड्रेसमध्ये प्रियांका एवढी सहज का होती याचा खुलासा तिनं यावेळी केला. प्रियांका म्हणाली, जेव्हा एखादा ब्रॅन्ड माझ्यासाठी कपडे तयार करतो तेव्हा ते या गोष्टीची नेहमी काळजी घेतात की तो ड्रेस माझ्या बॉडीवर एकदम परफेक्ट फिट बसेल. या ड्रेसमध्ये आत एक ट्यूल लावण्यात आलं होतं ज्याच्यामुळे तो ड्रेस मला व्यवस्थित फिट बसला. हे ट्यूल एक जाळीदार कापड असतं. पारस छाब्राच्या गर्लफ्रेंडला Bigg Boss च्या घरातील ‘या’ स्पर्धकाशी करायचंय लग्न
प्रियांका पुढे म्हणाली, मी कोणत्याही फंक्शनमध्ये वॉर्डरोब मालफंक्शन शिकार होणार नाही याची नेहमीच काळजी घेते. मी जेव्हाही एखादा ड्रेस घालते. तेव्हा त्यात मी कम्फर्टेबल असते. मी तेव्हाच घरातून बाहेर पडते जेव्हा मला त्या ड्रेसमध्ये सुरक्षित वाटत असतं. वॉर्डरोब मालफंक्शन कोणालाच आवडत नाही. त्यामुळे मुद्दाम कोणीच त्यात पडत नाही. ‘हो मी कार्तिकला डेट करते पण…’ रिलेशनशिप स्टेटसवर सारा अली खानचा खुलासा प्रियांका म्हणाली, जोनस वाइफ्स जेव्हा कुठलंही फंक्शनला जाणार असतात. एका डिझायनर आउटफिट्स कॅरी करतात त्यावेळी सर्वात आधी आम्ही सर्वजणी एकमेकांना फोटो शेअर करतो. त्याबद्दल एकमेकांचे सल्ले घेतो. मला याबाबत अजिबात वाइट वाटत नाही की मी काय परिधान केलं होतं किंवा त्यांनी काय परिधान केलं होतं. हे फक्त मनोरंजनासाठी होतं.
प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी मात्र आपल्या मुलीचं समर्थन करत तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. प्रियांकावर टीका करणाऱ्यांनी मधू चोप्रा यांनी अनोळखी म्हटलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना मधू चोप्रा म्हणाल्या, प्रियांकाला ट्रोल करणारे अनोळखी लोक आहेत जे आपल्या कम्प्युटर्स किंवा तत्सम गोष्टींमागे लपलेले आहेत. प्रियांका तिच्या अटींवर जगते. ती कोणालाही नुकसान पोहोचवत नाही आहे. हे तिचं शरीर आहे आणि तिच्या एक सुंदर शरीर आहे. ‘स्वत:ला हिंदू म्हणत असाल तर…’, शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर भडकली ट्रोलर्सवर निशाणा साधत मधू चोप्रा म्हणाल्या, ट्रोल करणारे स्वतःच्या आयुष्यात आनंदी नाहीत त्यामुळेच ते अशाप्रकारे घाणेरड्या गोष्टी करुन दुसऱ्यांवर अशा वाईट कमेंट करुन स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी अशा लोकांवर लक्ष कधीच देत नाही. हा ड्रेस घालण्याआधी प्रियांकानं मला त्याचं सॅम्पल दाखवलं होतं आणि मला माहित होतं की हा ड्रेस घालणं तिच्यासाठी रिस्की असू शकतं. पण हा काही सुंदर ड्रेसपैकी एक ड्रेस होता.
प्रियांकानं निकसोबत ग्रॅमी 2020च्या रेड कार्पेटवर फॅशन डिझायनर राल्फ अँड रुशोच्या डिझायनर ड्रेसमध्ये एंट्री केली होती. या इव्हरी व्हाइट गाऊनची हायलाइट होती त्याची लॉन्ग नेकलाइन. ही नेकलाइन खूपच रिव्हिलिंग होती. ज्यामुळे प्रियांका सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली. या ड्रेसमधील फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा ड्रेस आतापर्यंत तिचा सर्वात वाईट ड्रेस असल्याचं म्हटलं होतं.