मुंबई, 08 ऑक्टोबर : ग्लोबल स्टार आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा ‘द स्काय इज पिंक’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. त्यासाठी प्रत्येक शहरात जाऊन ती या सिनेमाचं धडाक्यात प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण नुकताच या सिनेमातील एक अनसीन व्हिडीओ लीक झाला आहे. ज्यात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर रोमान्स करताना दिसत आहेत. प्रियांका आणि फरहानचा हा बेडरुम व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका आणि फरहान बेडरुमध्ये त्यांचं लव्ह लाइफ अॅक्टिव्ह करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील त्यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. व्हिडीओमध्ये प्रियांका आणि फरहान बोल्ड अवतारात दिसत असून एकीकडे फरहान रोमान्स करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे प्रियांका त्यांच्याकडे पाहून हसताना दिसत आहे. त्यानंतर ती फरहानला सांगते की त्यानं चुकीची अंडरविअर घातली आहे. यानंतर प्रियांका मोगली सिनेमातील गाणं, ‘जंगल जंगल बात चली है’ हे गाणं गाताना दिसते. वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक
या सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 3 वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे तिच्या या सिनेमाची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. द स्काय इज पिंकचं दिग्दर्शन सोनाली बोसनं केलं आहे. हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे. या ‘विश्वसुंदरी’ अभिनेत्रीला मारायचा पती; 10 वर्षं आहे चित्रपटसृष्टीतून गायब
या सिनेमाची कथा मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी हिचे आई-वडील अदिती आणि निरेन यांच्या जीवनावर आधारित आहे. ही कथा आयशाची आहे जी पुढे सर्वांची प्रेरणा बनली. या सिनेमात झायरा वसीमनं आयशाची भूमिका साकारली आहे. ‘Superstar Singer’मध्ये 9 वर्षांची प्रीती ठरली अव्वल; जिंकली 15 लाखांची रक्कम ================================================================== VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं