JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priya Bapat: 'तू आता तारा झालीस...' प्रिया बापटने आईसाठी लिहिलेली पोस्ट तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

Priya Bapat: 'तू आता तारा झालीस...' प्रिया बापटने आईसाठी लिहिलेली पोस्ट तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

नुकतंच प्रियाने इन्स्टाग्रामवर आईसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. प्रियाने आईसाठी लिहिलेली ही पोस्ट वाचून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

जाहिरात

प्रिया बापट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जानेवारी:  मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापट ला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करून तिने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रिया बापट ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असते. प्रिया बापटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. प्रिया बापट ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच प्रियाने इन्स्टाग्रामवर आईसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. प्रियाने आईसाठी लिहिलेली ही पोस्ट वाचून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. प्रियाने काही वर्षांपूर्वीच आपल्या आईला गमावलं. ती अनेकदा आपल्या पोस्ट्मध्ये आईचा उल्लेख करताना दिसते. प्रियाने आपल्या आईसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आईसोबतचा एक गोड फोटोही शेअर केला आहे. मी तुझ्यासारखी खंबीर होण्याचा प्रयत्न करतेय असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा - Anant Radhika Mehandi : अंबानींच्या सुनेचा राजेशाही थाट; मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी सुंदर सजली राधिका तिने आईसाठी लिहिलंय कि, ‘मला एक फुलपाखरू दिसलं आणि मला माहीत आहे की ते तूच आहेस. मला एक फूल दिसलं आणि त्यात मला तू दिसलीस. तुझं त्यांच्यावर किती प्रेम होतं हे मला माहीत आहे आणि म्हणूनच देवाने तुला त्यांच्यासोबत राहण्याची, बागडण्याची संधी दिली. तू गेल्यानंतर, तुझ्याशिवाय जगायला शिकणं अजिबात सोपं नव्हतं. परंतु तूच नेहमी म्हणायचीस ना की हे जीवनाचं वर्तुळ आहे, सत्य आहे आणि इथे प्रत्येकाला पुढे जावंच लागतं. तुझ्याशिवाय आमचं संपूर्ण आयुष्य अपूर्ण, निर्रथक आणि शिळं असल्यासारखं वाटतं. मग मी तुझा लढा आठवते. तू तुझ्या दुःखात आणि वेदनेतही कशी आनंदी होतीस हे आठवते, कोणत्याही परफेडीची अपेक्षा नसलेलं तुझं हसू आठवते आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने जीवन जगायला उभी राहते. पुन्हा एकदा कठोर परिश्रम आणि मेहनत करण्यासाठी, मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी राहते. तुझं प्रेम माझ्या नसानसांत वाहतंय आई.’

संबंधित बातम्या

तिने पुढे लिहिलं, ‘ते म्हणतात की तू आता तारा झाली आहेस आणि तू आम्हा सर्वांच्या वर तिथे आकाशात राहतेस. आईकडे नेहमीच एक वेगळी शक्ती असते पण आता तुझ्याकडे जादूची कांडी आहे, मग मी काळजी का करावी? मी मुळीच काळजी करत नाही. अजिबात नाही. तू आहेस ना.’ तिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चाहते आणि तिचे कलाकार मित्र तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला धीर देताना दिसत आहेत.

प्रिया बापटच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, मागच्या वर्षात फारशी कुठे झळकली नाही.  ती ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे, अशी चर्चाही रंगली आहे. नुकतंच तिने एका प्रॉजेक्ट्च शूटिंग पूर्ण झाल्याची पोस्ट केली होती. आता प्रियाला नवीन भूमिकेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या