मुंबई 9 जुलै: सध्या बॉलिवूडमध्ये गुड न्यूजचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt pregnancy) काहीच दिवसापूर्वी तिच्या घरी नवीन पाहून येण्याचे संकेत दिले आहेत. आता अजून एका मराठी अभिनेत्रींकडे सुद्धा गुड न्यूज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही अभिनेत्री आहे (Prarthana Behere) प्रार्थना बेहरे. काय आहे ही गुड न्यूज? प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय प्रार्थना सध्या सोशल मीडियावर (Prarthana Behere instagram) सुद्धा बरीच सक्रिय झाली आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमधून आपल्याकडे असणाऱ्या गुड न्यूजची माहिती दिली आहे. प्रार्थनाची गोड बातमी थोडी वेगळी आहे. प्रार्थनाला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे एका नव्या पेट पाहुण्याचं आगमन झालं आहे. ‘मूव्ही’ असं तिच्या छोट्याशा पेटचं नाव असून chow chow जमातीच हे एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू आहे. तिने या गोड बातमीचा एक खास व्हिडिओसुद्धा शेअर केला ज्यात ती आपल्या बेबी पेटचे लाड करताना त्याला प्रेम करताना दिसत आहे. प्रार्थनाला पाळीव प्राण्यांबद्दल खूपच प्रेम असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्याकडे गब्बर नावाचा एक कुत्रा आहे तसंच फिल्मी नावाचं एक छोटंसं पिल्लू सुद्धा फॅमिलीचा एक भाग आहे. आपल्या पेट्स बरोबर घालवलेले अनेक क्षण ती कायम सोशल मीडियावर शेअर करत आली आहे. हे ही वाचा- Shreya Bugde : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीचं घर आहे एकदम टीपटॉप; PHOTO पाहून थक्क व्हाल! तिच्या पेट्सचं अनोखं इन्स्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे. तिच्या या पेट परिवारात अजून एका पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रार्थनाने आपल्या सगळ्या छोट्या दोस्तांची भन्नाट नावं ठेवली आहेत. गब्बर, फिल्मी सह आता मूव्ही सुद्धा त्यांच्यामधला एक नवा मेम्बर बनला आहे.
मराठीतील अनेक कलाकार ते पेट मॉम डॅड आहेत. प्रार्थना सुद्धा तिच्या पेट मॉम क्षणांचा अँन्ड लुटताना दिसत आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या आकर्षणचा विषय बनला आहे. जेवढी क्युट चाहत्यांना प्रार्थना वाटते तेवढाच क्युट हा नवा मेंबर सुद्धा वाटत आहे असं आलेल्या कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.