JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Prajakta Mali:एका नायिकेनं केलं दुसऱ्या नायिकेचं कौतुक, 'अनन्या' पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali:एका नायिकेनं केलं दुसऱ्या नायिकेचं कौतुक, 'अनन्या' पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

एक अभिनेत्री दुसऱ्या नायिकेचं कौतुक करते असं फार कमी वेळा होतं. असचं झालंय अनन्या सिनेमबाबात. अभिनेत्री हृता दुर्गुळेचा अनन्या हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं हृताचं कौतुक केलं आहे. वाचा तिची खास पोस्ट.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै: रानबाजार फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. गेली काही दिवस प्राजक्ता तिचे हटके फोटो शेअर करताना दिसत आहे. प्राजक्ताला सध्या बॉलिवूडच्या रेट्रो गाण्यांची भुरळ पडली आहे. प्रत्येक पोस्टमधील तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून प्राजक्ताचं प्रचंड कौतुक होत आहे.  दरम्यान प्राजक्ताची एक पोस्ट पुन्हा एकदा लक्ष वेघून घेत आहे. अभिनेत्रीनं नुकताच अनन्या हा सिनेमा पाहिला आणि सिनेमा पाहिल्यानंतर तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांचं आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांचं कौतुक केलं. या पोस्टचं वेगळेपण म्हणजे एका नायिकेनं दुसऱ्या नायिकेचं कौतुक केलं आहे. प्राजक्तानं हृताचं केलेलं कौतुक पाहून दोघींच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. अनन्या सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला प्राजक्तानं हजेरी लावत संपूर्ण सिनेमा पाहिला. सिनेमाच्या या स्पेशल स्क्रिनिंगला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. सिनेमा पाहिल्यानंतर प्राजक्ताला सिनेमा प्रचंड आवडला. प्राजक्तानं पोस्ट शेअर करत म्हटलं, ‘काल अनन्या चित्रपट पाहिला. शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे हा विचार हा सिनेमा दृढ करतो’. हेही वाचा - ‘वैदेही’ आणि ‘दीपू’ला हृताचा कोल्ड्रिंक धक्का; Timepass3 चं हे गाणं पाहून तुम्हीही पडाल चाट अनन्या हा सिनेमा प्रताप फड यांनी दिग्दर्शीत केला आहे.  प्रताप फड यांचा हा दिग्दर्शीत केलेला सिनेमा आहे. दिग्दर्शकाचं कौतुक करत प्राजक्तानं म्हटलंय, ‘माझा दिग्दर्शक मित्र आणि सिनेमाचा लेखक दिग्दर्शक प्रताप फड सर, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी. हा तुमचा पहिला चित्रपट आहे हे कुठेही जाणवत नाही. खूप प्रेम आणि खूप अभिमान’.

संबंधित बातम्या

प्राजक्तानं सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री हृताचं विशेष कौतुक केलं. तिनं म्हटलंय, ‘विशेष कौतुक हृताच. काम खूपच आवडलं. किंबहूना सगळ्यांनीच सुंदर कामं केली आहेत. अतिशय मनोरंजक आणि आशादायी चित्रपट चूकवू नका मंडळी’. पोस्टच्या शेवटी मात्र प्राजक्तानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्तानं प्रताप फड, हृता दुर्गुळे आणि  टीमबरोबर फोटो काढला आहे. या फोटोत ती फार हसताना दिसतेय. त्यामुळे तिनं शेवटी तळटीप लिहित म्हटलंय, ‘मी चित्रपटात नाही. इतकी हसतेय की गैरसमज होऊ शकतो. म्हणून ही तळ टीप’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या