आदिपुरूष सिनेमाचा रिव्ह्यू देणाऱ्या मारहाण
मुंबई, 16 जून : अभिनेता प्रभास आणि कृती सेननची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरूष हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. संपूर्ण देशातील प्रेक्षकांनी सिनेमाची आतुरतेनं वाट पाहिली होती. आदिपुरूषनं रिलीज आधीच अॅडवान्स बुकींग करत सिनेमाची अर्धी कमाई केली. आज देशभरात सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल होता. मात्र सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांनी सिनेमाप्रती काही प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात प्रभासचा एक फॅन दुसऱ्या फॅनला मारताना दिसतोय. थिएटर बाहेर सिनेमाचा रिव्ह्यू देणाऱ्या त्या व्यक्तीला सगळ्यांनी धू धू धुतलाय. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. आदिपुरूष सिनेमा पाहून आल्यानंतर प्रेक्षकांच्या खऱ्या प्रतिक्रिया समोर आल्यात. ट्विटरवर अनेक पल्बिक रिव्हूय पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रेक्षक हैद्रबाद येथून सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर त्याचा खरा रिव्ह्यू सांगत असताना तिथे प्रभासचा एक फॅन येतो. रिव्ह्यू देत असलेल्या त्या व्यक्तीला थांबवतो आणि पुढे त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते. सिनेमा पाहून आलेले आणि पाहण्यासाठी जाणारे प्रेक्षक यांची भांडणं पाहण्यासाठी एकच गर्दी करतात. हेही वाचा - Adipurushच्या चालू शोमध्ये घुसलं माकडं, प्रभासची एंट्री होताच बघतच राहिलं, Video व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, दोघांची सिनेमाच्या रिव्ह्यूवरून झालेली बाचाबाची इतकी वाढते की रिव्ह्यू देणाऱ्या त्या व्यक्तीला सगळे मिळून धू धू धूतात. त्याच्या पोटात आणि पाठीत बुक्के मारून त्याला जमिनीवर पाडण्यात येतं. ‘खरा रिव्हूय दिल्याचं फळ’, असं म्हणत या घटनेचा अनेकांनी निषेध केलाय. हा व्हिडीओ तेलुगू भाषेतील आहेत. रिव्हूयू देणारा माणूस हा तेलुगूमध्ये बोलताना दिसत आहे.
आदिपुरूष आलेल्या प्रेक्षकांनी रिव्हूय दिलाय. ‘खऱ्या रामायणाची वाट लावण्यात आली’, ‘प्रभासमध्ये बाहुबली वाला प्रभास दिसतोय’. त्याचप्रमाणे ‘सगळी पात्र टपोरी भाषा बोलत आहेत’, ‘सिनेमा पाहून चुकी केली, पैसै वाया गेले’, अशा प्रकारचे रिव्ह्यू प्रेक्षकांनी थिएटरबाहेर येताच दिले आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आदिपुरूषच्या VFX वरून जबरदस्त ट्रोलिंग करण्यात आलं आहे. रामानंद सागर यांच्या रामायणाशी आदिपुरूषची तुलना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची हेअर स्टाइल चांगलीच चर्चेत आलीये. प्रेक्षकांनी त्यावर मिम्सचा पाऊस पाडला आहे.
इतक्या ट्रोलिंग आणि निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर आदिपुरूष सिनेमा फार काळ थिएटरमध्ये टिकणार का हे येणाऱ्या काळात पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.