प्रभास आणि अनुष्का शेट्टी
मुंबई, 03 मार्च: बाहुबली एक असा चित्रपट होता जो आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. बाहुबली आणि देवसेना यांच्या प्रेम कहाणीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. बाहुबली आणि देवसेना यांच्या भूमिका प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांनी साकारल्या होत्या. हे दोघेही कलाकार सगळीकडे लोकप्रिय झाले. पण याचदरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. बाहुबलीदरम्यानच या दोन्ही स्टार्सच्या लिंकअपच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. या दोघांनीही नेहमी त्यांच्या नात्याला नकार दिला पण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. पण त्यानंतर असं काय झालं कि हे दोघे एकमेकांपासून दूर झाले, काय होतं नक्की दोघांच्या ब्रेकअपचं कारण जाणून घ्या. प्रभास आणि अनुष्का दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणून संबोधत राहिले. पण आता आलेल्या रिपोर्टनुसार सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्यातील ब्रेकअप खूपच वाईट होते. तेव्हापासून दोन्ही स्टार्सनी एकमेकांपासून अंतर ठेवले होते. कदाचित याच कारणामुळे प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्यातील घट्ट मैत्रीही नाहीशी झालेली दिसते. Hrithik Roshan: सिड-कियारा नंतर आता हृतिक-सबाची बारी! अभिनेत्याच्या लग्नाबाबत समोर आली मोठी अपडेट सियासत. कॉमच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सुपरस्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी एका सिरीयस रिलेशनशिप होते. पण पुढे अभिनेत्रीच्या एका ज्येष्ठ नायकाशी असलेल्या नात्यामुळे दोघांच्या नात्यात खटके उडू लागले आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अनुष्का शेट्टीच्या एका वरिष्ठ नायकाशी असलेल्या बाँडिंगमुळेच प्रभासने स्वतःला अभिनेत्रीपासून दूर केले. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. दोघांच्या ब्रेकअपनंतर सुपरस्टार प्रभास त्याच्या चित्रपटांमध्ये व्यस्त झाला. तसेच, अभिनेत्री अनुष्का शेट्टी लाइमलाईट पासून दूर झाली. अभिनेत्री अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असते. दरम्यान, सुपरस्टार प्रभासचे नाव अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडले जाऊ लागले. करण जोहरच्या चॅट शोमध्ये अभिनेत्री क्रिती सेननने प्रभासला फोन केल्यावर दोघांमधील लिंकअपची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. यानंतर प्रभास अभिनेत्री क्रिती सेननसोबत खूप मनमोकळं बोलताना दिसला. त्याच्या सहसा लाजाळू आहे, अभिनेत्रींनशी बोलताना तो खूप लाजतो. पण , तो त्याची सह-कलाकार क्रिती सॅननसोबतच्या खूपच मनमोकळं बोलू लागला त्यामुळेच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, क्रितीने प्रत्येक वेळी या बातम्यांचे खंडन केले आहे.
अभिनेत्री अनुष्का शेट्टीही लवकरच रुपेरी पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्री पुढे तेलुगु स्टार नवीन पॉलिशेट्टीसोबत मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लुक निर्मात्यांनी नुकताच रिलीज केला आहे. दरम्यान नुकतंच तिचा लेटेस्ट लूक समोर आला होता. तेव्हा अभिनेत्रींच्या वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोल करण्यात आले.