प्रभासने 'प्रोजेक्ट के'साठी किती मानधन घेतलं?
मुंबई, 26 जून : साऊथ अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आदिपुरूष या सिनेमामुळे चर्चेत आहे. आदिपुरूष नंतर प्रभासचं नशीब चमकवण्यासाठी त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पाटणी आणि कमल हसन अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘प्रोजेक्ट के’ हा सिनेमा लवकरच येऊ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची जबरदस्त उत्सुकता आहे. नाग अश्विनी दिग्दर्शित प्रोजेक्ट के हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. महागडा सिनेमा असल्यास आता सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांनाही देखील तगडं मानधन घेतलं असणार हे नक्की. अभिनेता प्रभास हा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास कुठे तरी कमी ठरतोय. बाहुबलीनंतर प्रभासचा करिअरला ग्राफ सातत्यानं खालावत चालला आहे. बाहुबलीनंतर आलेल्या राधे श्याम, साहो, आदिपुरूष या सिनेमांनी प्रेक्षकांची निराशा केली. तिन्ही सिनेमात प्रभासचं काम प्रेक्षकांच्या काही पसंतीस पडलं नाही. कोट्यावधी मानधन घेऊन प्रभासचे मागील सगळे प्रोजेक्ट बॉक्स ऑफिसवर आपटले. आता ‘प्रोजेक्ट के’ तरी प्रभासचं नशीब उजळवेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. हेही वाचा - ब्रिटनच्या शाही घराण्यातील आहे सनी देओलची पत्नी पूजा! लपून केलं लग्न आणि ‘त्या’ फोटोमुळं समोर आलं सत्य
अनेक वर्षांनी ‘प्रोजेक्ट के’च्या निमित्तानं अभिनेत अमिताभ बच्चन आणि कमल हसन एकत्र मोठ्या स्क्रिनवर दिसणार आहे. दोन सुपरस्टार्सना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. सिनेमाचं 70 टक्के शुटींग पूर्ण झालं आहे. प्रोजेक्ट के 12 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशात रिलीज होणार आहे.
प्रसिद्ध फिल्म क्रिटिक मनोबाला विजयबालन यांनी प्रोजेक्ट के च्या स्टारकास्टचं मानधन किती यासंबंधी एक ट्विट केलंय. या ट्विटनुसार, ‘प्रोजेक्ट के’साठी अभिनेते कमल हसन यांनी 20 कोटी मानधन आकारलं आहे. तर दीपिका पादुकोण हिनं 10 कोटी, अमिताभ बच्चन आणि दिशा पाटणी यांनाही 20 कोटी मानधन देण्यात आलं आहे. या सगळ्या कलाकारांपेक्षा चौपट मानधन अभिनेता प्रभासनं घेतलं आहे. ‘प्रोजेक्ट के’साठी प्रभासनं तब्बल 150 कोटी मोजले आहेत. प्रभासच्या मानधनाची किंमत ऐकून धक्का बसला असेल. सिनेमाचं एकूण बजेट हे 600 कोटी रुपये आहे. आदिपुरूष देखील 600 कोटींच्या बजेटचा सिनेमा होता. त्यातही प्रभास आहे. मात्र सिनेमा सप्शेल तोंडावर पडला. आता ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभास आपल्या अभिनयानं जादू करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.