JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Adipurush: 'आदिपुरुष' मध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली 'आमचा चित्रपट येतोय'!

Adipurush: 'आदिपुरुष' मध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली 'आमचा चित्रपट येतोय'!

‘आदिपुरुष’ चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असताना आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचे पोस्टर आज रिलीज झाले आहे. पण मराठी प्रेक्षकांसाठी एक अभिमानाची बातमी म्हणजे एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

जाहिरात

आदिपुरुष

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 30 सप्टेंबर : भारतात बाहुबली अशी ओळख अभिनेता म्हणजेच प्रभास. बाहुबलींनंतर प्रभासने अतिशय मोजकेच चित्रपट केले आहेत. पण त्यातील त्याच्या भूमिका फारशा गाजल्या नाहीत. आता प्रभास पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ असं या चित्रपटाचं नाव असून हा रामायणावर आधारित असणारा सिनेमा आहे. या चित्रपटांचीही घोषणा झाल्यापासून याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. आधीच प्रभासचा सिनेमा त्यात रामायणावर आधारित असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीच क्रेझ निर्माण झाली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असताना आता या  बहुप्रतीक्षित सिनेमाचे पोस्टर आज रिलीज झाले आहे. तसेच टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण मराठी प्रेक्षकांसाठी एक अभिमानाची बातमी म्हणजे एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत  ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन करत आहेत. त्याचसोबत आता एक मराठी अभिनेत्रीही या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीच नाव आहे तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने अनेक दमदार भूमिका करून मराठी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता तेजस्विनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. तिने सोशल मीडियावर या ‘आदिपुरुष’ चे पोस्टर रिलीज करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हेही वाचा - Gosht Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित तिने या पोस्टमध्ये म्हटलंय कि, ‘‘2 ऑक्टोबरला आमच्यासोबत चित्रपटाचा टीझर बघायला तयार राहा’’ तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार मित्रांनी तसेच चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिला आता या भव्य दिव्य चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.

संबंधित बातम्या

सध्या जिकडेतिकडे ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. बाहुबली सारखाच  ‘आदिपुरुष’ हा भव्यदिव्य सिनेमा असणार आहे. सुपरस्टार प्रभास या चित्रपटात भगवान रामच्या भूमिकेत झळकणार असून क्रिती  सेनन आणि सनी  सिंग हे कलाकार दिसणार आहेत. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत  ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन करत आहेत. पण तेजस्विनी या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे ते मात्र गुलदस्त्यात आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती लाल किल्ल्याच्या मैदानावर अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला सेट बनवणार आहेत. प्रभास यावर्षी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ही  एक आनंदाची बातमी आहे. ‘आदिपुरुष’चे शूटिंग खूप आधी संपले आहे. हा एक 3D चित्रपट असून VFX चे काम चालू होते. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. पण रिलीजनंतर हा सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणे करेल यात शंका नाही. आता चित्रपटाचा टिझर पाहण्यासाठीच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या