प्रिया बापट अभिनयासोबत 'या' कामातही प्रसिद्ध

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट.

अभिनयाशिवाय अनेक कलाकार सध्या विविध व्यवसायात उतरलेले दिसतात. 

यामध्ये प्रियाचाही सामावेश होतो. ती एक उत्तम उद्योजिका आहे. 

प्रियाने आपली बहीण श्वेतासोबत मिळून ‘सावेंची’ या नावाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.

अनेक वर्षांपासून हा ब्रँड सेलिब्रिटींची पसंती मिळवताना दिसत आहे.

 या ब्रँडची त्यांनी अधिकृत वेबसाईट देखील सुरू केलेली आहे. 

त्यामुळे ऑनलाइन खरेदीला त्यांच्या ग्राहकांनी जास्त पसंती दर्शवलेली पाहायला मिळते. 

प्रिया आणि श्वेता साड्यांचे भव्य प्रदर्शनही भरवतात. 

अभिनय आणि उद्योग दोन्ही क्षेत्रात प्रिया कमालीची सक्रिय आहे.