JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी 3 वर्षं दारू प्यायले नाही पण...' पूजा भटनं सांगितलं लोकांच्या आक्रमकतेचं कारण

'मी 3 वर्षं दारू प्यायले नाही पण...' पूजा भटनं सांगितलं लोकांच्या आक्रमकतेचं कारण

अभिनेत्री पूजा भटनं ट्वीट करत लोक दारुसाठी का एवढे आक्रमक झाले आहेत याचं कारण सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली दारूची दुकान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्याचं मद्यपींकडून जंगी स्वागत झालं मात्र सुरुवातीला पोलिसांचं ऐकणारे लोक नंतर मात्र त्यांच्यावरच आक्रमक झाल्याच्या घटना देशभरात विविध ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळालं. याबाबत अभिनेत्री पूजा भटनं ट्वीट केलं आहे. पूजानं सलग 3 ट्वीट करत लोक दारुसाठी का एवढे आक्रमक झाले आहेत याचं कारण सांगितलं आहे. तिचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पूजा भटनं देशभरातील दारूची दुकानं सुरू झाल्यानंतरच्या परिस्थितीवर ट्वीट केलं आहे. तिनं लिहिलं, मी तीन वर्षांपासून दारूला हात लावलेला नाही. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते की स्वतःचं जीवन जोखमीत टाकणाऱ्या लोकांपैकी एक नाही आहे. पण हे सुद्धा चुकीचं आहे की काही लोक मानसिक तणावाखाली असलेल्या लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत. ‘तुम्ही आमच्यासाठी देवदूत…’ नीतू कपूर यांनी अंबानींचे या शब्दांत मानले आभार

पूजानं पुढे लिहिलं, तुम्हाला माझं म्हणणं पटेल किंवा नाही माहित नाही. पण जे लोक मानसिक तणावाखाली किंवा डिप्रेशनमध्ये आहे त्या लोकांना वास्तवाचं भान नसतं. त्यामुळे त्यांच्या दारू पिणं हा एकच पर्याय उरलेला असतो. सध्या लोक अनिश्चिततेची शिकार होत आहेत. भविष्यात काय होणार याची त्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे कदाचित त्यांना दारू पिणं हा उत्तम पर्याय वाटत असेल. तुम्हाला जर हे बदलायचं असेल तर सुरुवातीला त्यांचं दुःख समजून घ्यायला हवं.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा पुरवठा पूर्णपणे बंद करता त्यावेळी लोक हताश होतात. निराशा वाढते आणि त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढतं. मी आता दारू पित नाही आणि आशा करते की तशी वेळ माझ्यावर येणार सुद्धा नाही. पण इतर व्यक्ती एवढ्या नशीबवान किंवा दृढनिश्चयी असू शकतील असं नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणतंही अनुमान लावू नका. दारूचं व्यसन हे एक आजारपण आहे. त्यांना प्रेम आणि मदतीची गरज आहे. (संपादन- मेघा जेठे) पाणीपुरी कशी खायची? विकी कौशल देतोय धडे, VIDEO पाहून आवरणार नाही हसू मुंबईत नाही तर या ठिकाणी असेल Bigg Boss चं घर, पहिल्या स्पर्धकाचं नावही आलं समोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या