पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे आज 30 डिसेंबर) सकाळी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. हिराबेन काही काळापासून वयोमानानुसार आजाराने त्रस्त होत्या. हिराबेन मोदी यांच्यावर काही दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली. हिराबेन यांच्या निधनाची बातमी समोर येताच सगळेजण दुःख व्यक्त करत आहेत. बॉलिवूड कलाकारांनीही पंतप्रधान आईच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हटली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतने इंस्टाग्रामवर एका स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पंतप्रधान मोदी आणि तिची आई हीराबेनसोबत दिसत आहे. कंगनाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या कठीण काळात देव पंतप्रधानांना संयम आणि शांती देवो. ओम शांती’.
अक्षय कुमाारने लिहिलं, ‘आईला गमवायच्या दुःखासमोर दुसरं कोणतं दुःख आहे. हे दुःख सहन करण्याची सहनशक्ती देव तुम्हाला देवो.’
बॉलीवूड स्टार आणि अभिनेता सोनू सूदने ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सोनूने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आदरणीय मोदीजी, आई कुठेही जात नाही, तर कधी कधी देवाच्या चरणी बसते जेणेकरून तिचा मुलगा इतरांसाठी चांगले करू शकेल. आई सदैव तुझ्यासोबत होती आणि राहील. ओम शांती.’
कॉमेडियन कपिल शर्मानेही पीएम मोदींचे ट्विट रि-ट्विट केले आणि लिहिलं, ‘आदरणीय नरेंद्र मोदी जी, आईनं हे जग सोडून जाणे खूप वेदनादायी आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. माताजींना देव तुमच्या चरणी स्थान देवो हीच प्रार्थना. ओम शांती’.
अनुपम खेर लिहितात, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी! तुमची आई श्री #हीराबाजी यांच्या निधनाबद्दल ऐकून मी दु:खी झालो आहे. तुमच्या आयुष्यातील तिची जागा कोणीही भरु शकत नाही. पण तुम्ही भारताचे पुत्र आहात. देशाच्या प्रत्येक आईचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे. माझ्या आईचे पण.
दरम्यान, बुधवारी हिराबेन मोदी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना अहमदाबादमथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना आज हिराबेन यांचं निधन झालं. सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.