JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'यारो दोस्ती बड़ी हसीन है... '; मराठी सेलेब्सकडून KK यांना भावपूर्ण आदरांजली

'यारो दोस्ती बड़ी हसीन है... '; मराठी सेलेब्सकडून KK यांना भावपूर्ण आदरांजली

केके यांच्या निधनामुळे चाहत्यांसह सेलिब्रिटींना साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जून : बॉलिवूडचा (Bollywood) लोकप्रिय गायक केकेचं (Singer KK) काल रात्री कोलकत्ता येथे निधन झालं. तो कोलकत्ता येथील एका कॉलेज कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने पहिला त्याला हॉटेल रूमवर आणि नंतर कोलकत्ता येथील CMRI हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. केकेला ‘पल’ या पहिल्या अल्बममधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘यारों’, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप के’ या गाण्यानीं केकेच्या करिअरमध्ये मोठं यश मिळवून दिलं होतं. केके यांच्या निधनामुळे चाहत्यांसह सेलिब्रिटींना साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यात मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनीही केके यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केके यांना आदरांजली अर्पण केली आहे

अभिनेता अभिनय बेर्डे याने केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

गायिका आर्या आंबेकर हिनं देखील केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं देखील केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने देखील केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेत्री सायली संजीव हिनं देखील केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे हिनं देखील केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेता शिव ठाकरे याने देखील केके यांना आदरांजली अर्पण केली आहे. याशिवाय अभिनेत्री गायत्री दातार, निखिल राऊत, गायिका जुईली जोगळेकर आणि पुष्कर जोग यांनी देखील इन्स्टाच्या माध्यमातून केके यांना आदरांजली अर्पण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या