मुंबई, 18 डिसेंबर : कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी रविवारी सकाळी अहमदाबादमधून अटक करण्यात आली होती. पायल हिने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पायलला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. पण आता तिला जामिन मिळाला मिळाला असून तिनं प्रसारमाध्यमांशी बोलताना जेलमध्ये घालवलेल्या एका रात्रीचा अनुभव शेअर केला. जेलमध्ये घालवलेल्या त्या एका रात्रीविषयी बोलताना पायल म्हणाली, ‘जेलमध्ये खूपच थंडी होती. तसेच ते जेल खूप घाणेरडं होतं. हे खूपच भीतीदायक होतं. त्यातही मला थंड जमिनीवर चटई अंथरुण झोपावं लागलं. मी आशा करते की माझ्या आयुष्यातला हा शेवटचा अनुभव असावा. मी फिमेल जनरल वॉर्डमध्ये होते. तिथे माझ्यासोबत अनेक महिला होत्या त्यांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले ज्यामुळे मी खूप भावूक झाले होते.’ डॉ श्रीराम लागू म्हणाले होते, ‘मी कधीच न केलेली गोष्ट माझ्याकडून त्यावेळी घडली’ पायलनं पुढे सांगितलं, ‘माझ्यासोबत त्या जेलमध्ये 5 हार्डकोर क्रिमिनल होते. त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं खाण अजिबात चांगलं नव्हतं. पण ज्यांना तिखट खाणं आवडतं त्यांच्यासाठी ते ठिक होतं. जेल मधून बाहेर आल्यानंतर मी खूप खूश आहे. त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची मी आभारी आहे.’
प्रसार माध्यमांशी बोलताना पायल म्हणाली, ‘मला राजकारण करुन यात गोवण्यात आलं आहे. मी नेहमीच देशासाठी विचार करते मी माझ्या देशाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं मला जेलमध्ये जायचं नाही. न्यालायाची मी आभारी आहे. मी जेलमध्ये गेले असले तरीही मी व्हिडीओ तयार करणं बंद करणार नाही. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करेन. पण मी हाही प्रयत्न करेन की माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही कींवा आता झाली तशी चूक पुन्हा होणार नाही.’ अदा शर्माच्या BOLD लुकवर चाहते घायाळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL
पायल म्हणाली, ‘मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि याच आधारावर मी मोतिलाल नेहरु यांच्यावर व्हिडीओ शूट केला आणि जेलमध्ये गेले. पण त्याआधी मी अशाप्रकारे कायदेशीर कारवाईचा बळी पडू शकते असं वाटलं नव्हतं. माझ्याकडे या सगळ्याची माहिती नाही कारण माझा कोणीही वकिल नाही. त्यामुळे यापुढे मी या सर्वांपासून दूर राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करेन.’ व्यायामासोबतच अजय देवगण ‘या’ गोष्टीलाही देतो महत्त्व!